घरमनोरंजनBhoot Police : सैफ अली खानच्या 'भूत पोलीस' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Bhoot Police : सैफ अली खानच्या ‘भूत पोलीस’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Subscribe

सैफच्या  'भूत पोलीस' या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धूमाकूळ घातल असून चाहत्यांनी ट्रेलरला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) ‘भूत पोलीस’ (Bhoot Police) सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये या सिनेमाची भारीच चर्चा रंगली आहे. सध्या सैफच्या  ‘भूत पोलीस’ या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला असून चाहत्यांनी ट्रेलरला चांगलीच पसंती दर्शवली आहे. भूत पोलिस हा सिनेमा एक हॉरर कॉमेडी सिनेमा (Horror comedy movie)असणार आहे. सैफ सोबतच सिनेमात अर्जुन कपूर (Arjun Kpoor) ,जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ,यामी गौतम (Yami Gautam)यांच्या मुख्य भूमिका असणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर चाहत्यामध्ये देखील चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता रंगताना दिसत आहे.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भूत पोलीस सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे शूटींग ठप्प झाले होते. हा सिनेमा 10 सप्टेबंर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय मेकर्सने घेतला होता. (Trailer of Saif Ali Khan New Movie ‘Bhoot Police’ released)

ट्रेलर पाहा- 

- Advertisement -

पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय आता मेकर्सने घेतला आहे. भूत पोलिस हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney Hotstar VIP) या ओटीटी प्लॅटफॉमवर यंदा 17 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे थेटर सुरू झाले नसल्यामुळे अनेक बिग बजेट सिनेमाच्या मेकर्सने अद्याप सिनेमा थेटरमध्ये रिलीज करण्याबद्दल कोणतेही पाऊलं उचलली नाहीये. तसेच थेटर बंद असल्याचा फायदा ओटीटी प्लॅटफॉम पुरेपूर घेताना दिसत आहे.


हे हि वाचा – ‘२०० हल्ला हो’ नंतर रिंकू राजगुरू दिसणार नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -