घरताज्या घडामोडीओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिकेच्या नव्या गाइडलाइन्स जारी, न्यू ईयर पार्टीवर राहणार...

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिकेच्या नव्या गाइडलाइन्स जारी, न्यू ईयर पार्टीवर राहणार वॉच

Subscribe

देशात कोविड-१९ च्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्ली, चंदीगड आणि तेलंगणामध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. मुंबईत सुद्धा ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. नाताळ आणि न्यू ईयरला अवघे काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. नाताळ आणि न्यू ईयरला अनेक लोकं सेलिब्रेशन करण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, हीच गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गाइडलाइन्स जारी करत आवाहन केले आहे.

मंबई महापालिकेने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या असून नाताळ आणि न्यू ईयर सेलिब्रेशन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये गर्दी टाळत गाइडलाइन्सचं पालन करण्यास सांगितलं आहे. गाइडलाइन्सचं पालन न केल्यास कारवाईला सामोर जावे लागू शकतं. असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.

- Advertisement -

देशात ओमिक्रॉन रूग्णांची संख्या १४० च्या वर गेली आहे. तर युरोपमधील ब्रिटन आणि अन्य देशांत ओमिक्रॉनचा उद्रेक होताना पहायला मिळत आहे. राज्यात आज(रविवार) ८ नवीन रूग्णांची भर पडली असून ही रूग्णसंख्या ४८ वर गेली आहे. तर पुणे महापालिका क्षेत्रात १ रूग्ण आढळून आला आहे. तेलंगणात १२ नवे रूग्ण आणि कर्नाटकात ६ नवे रूग्ण आढळून आले आहेत. केरळमध्ये ४ नवे रूग्ण आढळून आले असून राज्यातील एकूण संख्या ११ इतकी झाली आहे.

काय आहेत गाइडलाइन्स ?

  • हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल्स आणि चित्रपटगृहे यांना ग्राहक संख्या आणि नियम व अटी लादण्यात आल्या आहेत. तसेच त्याचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
  • एखाद्या कार्यक्रमासाठी १ हजाराच्या वर लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्यास व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.
  • बंदिस्त सभागृहात फक्त ५० टक्के उपस्थिती आणि मोकळ्या जागेसाठी २५ टक्के उपस्थिती आहे.
  • ज्या व्यक्तींचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्याच व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी वावरता येणार आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवांचाही समावेश आहे.
  • विविध आस्थापने या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे पूर्ण लसीकरण बंधनकारक असेल. त्याचसोबतच मास्क, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझेशन याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -