घरताज्या घडामोडीनांदेडमधून १.१ टन ड्रग्जचा साठा जप्त, आंध्रप्रदेशातून ड्रग्ज आणल्याची समीर वानखेडेंची माहिती

नांदेडमधून १.१ टन ड्रग्जचा साठा जप्त, आंध्रप्रदेशातून ड्रग्ज आणल्याची समीर वानखेडेंची माहिती

Subscribe

मुंबईत एनसीबीच्या पथकाकडून जळगावात मोठी कारवाई

नांदेडमधून १.१ टन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून वाहनंदेखील जप्त करण्यात आली आहेत. परंतु अजून सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिलीये. आंध्रप्रदेशातून राज्यासह इतर राज्यांत गांजाची मोठी तस्करी होणार होती. असं देखील त्यांनी म्हटलंय. मुंबई एनसीबीने आज(सोमवार) सकाळी मोठी कारवाई केली आहे.

नांदेडमधून १.१ टन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय आणि दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. एक अवजड वाहन आणि चारचाकी वाहनाला सुद्धा जप्त करण्यात आलं आहे. आंध्रप्रदेशातून ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचं शोधकार्य अद्यापही सुरू असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गांजा तस्करीसाठी महाराष्ट्रात आणला जात असल्याची माहिती एनसीबीचे अधिकारी अमोल मोरे आणि सुधाकर शिंदे यांना मिळाली होती. हा गांजा आंध्र प्रदेशातून येत असल्याचेही समजले होते. त्यानुसार, सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांकडून तस्करांसाठी सापळा रचण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबईत एनसीबीच्या पथकाने जळगावात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १५०० किलो गांजा जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एनसीबीच्या पथकाने १५०० किलो गांजा जप्त केला आहे. तसेच हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणण्यात आला होता. या कारवाईमध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई सुरू आहे.

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -