घरताज्या घडामोडीसिल्व्हर ओकवरील हल्ल्याचे नागपूर कनेक्शन उघड, 'तो' एसटी कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

सिल्व्हर ओकवरील हल्ल्याचे नागपूर कनेक्शन उघड, ‘तो’ एसटी कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनातील कर्मचाऱ्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावले असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये नागपूरच्या व्यक्तीचाही वारंवार उल्लेख होत होता. सदावर्ते आणि नागपूरची ही व्यक्ती संपर्कात होती असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अखेर पोलिसांनी या नागपूरच्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात नागपूरच्या व्यक्तीचा सहभाग होता असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या चॅटची पडताळणी करण्यात आली. व्हॉट्सअॅप तपासल्यानंतर नागपूरच्या व्यक्तीचे कनेक्शन उघडकीस आले होते. नागपूरची व्यक्ती कोण आहे याबाबत चौकशी करण्यासाठी सदावर्तेंची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात केली होती.

- Advertisement -

नागपूरच्या कर्मचाऱ्याला अटक

हल्ल्याच्यापूर्वी वकील गुणरत्न सदावर्ते आणि नागपूरची व्यक्ती संपर्कात होती. नागपूरची व्यक्तीसुद्धा एसटी कर्मचारी आहे. एसटीमध्ये यांत्रिक पदावर ही व्यक्ती कार्यरत आहे. या व्यक्तीचे नाव संदीप गोडबोले असं आहे. मुंबई पोलिसांनी संदीप गोडबोलेंना ताब्यात घेतलं आहे.

नागपूरच्या व्यक्तीकडून आंदोलनाची व्यवस्था

मुंबईत सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्यामध्ये नागपूरच्या व्यक्तीकडून व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनाच्या दिवशी नागपूरची व्यक्ती मुंबईत होती. सर्व गोष्टी तो व्यक्तीच हँडल करत होता. महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर उतरुन गटागटाने शरद पवारांच्या घराच्या ठिकाणी येण्यास कर्मचाऱ्यांना सांगितले. सिल्व्हर ओकजवळ असलेल्या गार्डनमध्ये जमा झाल्यावर नागपूरच्या व्यक्तीने माध्यमांना माहिती दिली असे पोलिसांच्या तपासात उघड झाले असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Jayshree Patil : गुन्हा दाखल झाल्यानंतर जयश्री पाटील फरार, एसटी कर्मचाऱ्यांचे ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -