घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वे २ तासासाठी राहणार बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे २ तासासाठी राहणार बंद

Subscribe

गुरुवारी दुपारी १२ ते २ च्या सुमारास मुंबई-पुणे लेनवरील किलोमीटर क्रमांक ६५.५०० येथील ठिकाणी ओव्हरहेड गॅट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. आज दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबकडे जाणारी वाहतून पूर्णपणे बंद असणार आहे. या दरम्यानच्या वेळेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेन की.मी. ६५.५०० या ठिकाणी ओव्हरहेड गॅट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग यांच्यावतीने देण्यात आली आहे. चारचाकी वाहनचालकांनी आणि इतर प्रवाशांनी किवळे ब्रिज येथून जुना पुणे-मुंबई महामार्गाने मुंबईकडे प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२ ते २ च्या सुमारास मुंबई-पुणे लेनवरील किलोमीटर क्रमांक ६५.५०० येथील ठिकाणी ओव्हरहेड गॅट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान, सर्व प्रकारच्या अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहनं एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर क्रमांक ६६ या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे. याची नोंद प्रवाशांनी घ्यावी. तसेच हलकी चारचाकी वाहन आणि इतर प्रवाशी वाहन द्रुतगती मार्ग किवळे ब्रिज येथून जुना पुणे-मुंबई महामार्गवर वळविण्यात येणार आहेत. याची नोंद मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घ्यावी. तरी दुपारी १२ ते २ या वेळेत प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे, अस महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -