घरमहाराष्ट्रपुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

पुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Subscribe

पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मागील ७ तासांपासून पुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळं वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मागील ७ तासांपासून पुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळं वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील बोरघाटात शनिवारी सकाळच्या सुमारास केमिकल टँकर पलटी झाला. त्यामुळं वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून महामार्गावर ५ ते ६ किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर केमिकल सांडल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

अमृतांजन पुलाजवळ केमिकल टँकर पलटी झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र या कामाला वेळ लागत असल्यानं मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे.

- Advertisement -

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक केमिकल टँकर पलटी झाल्यानं त्यामधून केमिकल वाहू लागले. रस्त्यावर केमिकल पसरल्याने अनेक वाहन घसरू लागली. बोरघाटमध्ये शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यानंतर आता ती लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे.

पुण्याकडील वाहतूक धीम्या गतीनं सुरु आहे. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहन जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळविण्यात आली आहेत. मात्र, जुन्या महामार्गावर वाहतूक वळवल्यानं या प्रसंगाचा फायदा घेत टोल चालकांकडून पैसे वसूल जात आहेत.

- Advertisement -

एका ओला-उबेर चालकानं हे वास्तव व्हिडीओद्वारे समोर आणला आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर टोल दिला असताना, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही सक्तीने टोल वसूल केला जातोय, असा आरोप या चालकाने व्हिडिओत केला आहे. एका वृत्तनाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकल पसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी मुंबईला जाणारी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळविण्यात आलेली आहे. मात्र तिथं ही अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाली. गेल्या ७ तासंपासून प्रवासी ताटकळत आहेत. हे सर्व प्रवासी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील २७० रुपयांचं टोल देऊन इथं पोहचलेत.


हेही वाचा – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या तीन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -