घरमहाराष्ट्रअखेर मुंबई - पुणे तिसरी मार्गिका सुरू

अखेर मुंबई – पुणे तिसरी मार्गिका सुरू

Subscribe

मेल-एक्सप्रेस गाड्यांची सेवा पूर्ववत

यंदाच्या मुसळधार पावसामुळे मंकी हिल ते नागनाथदरम्यान तिसर्‍या मार्गिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मुंबई ते पुणे रेल्वे मार्गावरील तिसर्‍या मार्गिकेचे दुरुस्तीकाम मध्य रेल्वेने हाती घेतले होते. मुंबई ते पुणे रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला होता. मात्र या रेल्वे मार्गिका दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने 10 मेल-एक्सप्रेस गाड्यांची सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. 15 जानेवारी 2020 या मुदतीआधी ही मार्गिका खुली करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

यंदा घाटविभागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळल्यामुळे मुंबई ते पुणे मार्गावर काही ठिकाणी मोठा फटका बसला. मंकी हिल ते नागनाथदरम्यान रूळ उखडण्याबरोबरच रुळाखालील खडी वाहून गेली होती. सिग्नल बिघाडासह अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणारा तिसरा मार्ग बंद करावा लागला. यामुळे 3 ऑक्टोबरपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने घाटातील अन्य मेल-एक्स्प्रेसवरही याचा परिणाम झाला होता.

- Advertisement -

कामाला विलंब झाल्याने 15 जानेवारी 2020 नंतरच तिसरी मार्गिका सुरू होण्याची शक्यता मध्य रेल्वेने वर्तवली होती. मात्र, वेळेआधीच काम पूर्ण करण्यात आले आहे. अप मार्गावरून वेगमर्यादेसह मेल-एक्स्प्रेस रवाना करण्यात येणार आहे. तसेच, घाटातील उर्वरित काम पुढील महिनाभर सुरू राहणार आहे. मात्र, त्याचा मेल-एक्स्प्रेस वाहतुकीवर परिणाम होणार नाही. दरम्यान अप मार्गावरील काम पूर्ण झाल्याने या मार्गावरील रद्द करण्यात आलेल्या मेल-एक्स्प्रेस पूर्ववत करण्यात आल्या आहेत.

या मेल-एक्स्प्रेस पूर्ववत करणार
(12701-12702) मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, (18520-18519) एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, (17318-17317) एलटीटी-हुबळी एक्स्प्रेस, (07618-07617) पनवेल-नांदेड या गाड्यांचा समावेश आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -