घरमहाराष्ट्रमुंबई पुणे प्रवास महागणार

मुंबई पुणे प्रवास महागणार

Subscribe

चालकांना जास्त पैसे मोजावे लागणार

दिवाळीसाठीच्या विकेंडसाठी मुंबईबाहेर पडत असाल तर आता कार चालकांना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अतिरिक्त रूपये मोजावे लागणार आहेत. निवडणुकांच्या धामधुमित मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा प्रवास महागला आहे. तात्पुरत्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नेमलेल्या कंत्राटदाराकडून आता कार चालकांकडून वाढीव रूपये आकारण्याची सुरूवात झाली आहे. ही आकारणी वाढीव असली तरीही शासन मंजुरीनुसारच असल्याचे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे. सरासरी एका टप्प्यात ३५ रूपये जास्त मोजावे लागणार आहेत.मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खालापूर ते कुसगाव १३८ रूपये होते आता १७३ रूपये आकारण्याची सुरूवात झाली आहे.

खालापूर ते कुसगाव दरम्यान आतापर्यंत १३८ रूपये आकारण्यात येत होते. तर नवीन आकारणीनुसार या प्रवासादरम्यान १७३ रूपये आकारण्याची सुरूवात झाली आहे. पण ही वाढ शासन निर्णयानुसार लागु झालेली आहे. आधीची टोल वसुल करणारी कंत्राटदार कंपनी आयआरबीने एक रक्कम एमएमआरडीसीला दिली होती. त्यामुळे कार चालकांना शासन निर्णयापेक्षा कमी पैसे आकारण्याचा निर्णय हा त्या कंत्राटदार कंपनीला होता. पण नवीन टोल ऑपरेटींग एजन्सीची नेमणुक होईपर्यंत एमएसआरडीसीने आता तात्पुरत्या स्वरूपाचे कामाचे कंत्राट एका कंपनीला दिले आहे.

- Advertisement -

या कंपनीने कार चालकांसाठी तळेगाव ते कुसगाव तसेचतळेगाव ते खालापूर या टप्प्यात आता शासन निर्णयानुसार पैसे आकारण्यात येत असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली. त्यामुळे ही टोलमध्ये वाढ नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. शासन निर्णयानुसार ही वाढ आहे. तसेच आगामी ११ वर्षांच्या कालावधीसाठी जोपर्यंत नवीन शासन निर्णय होणार नाही तोपर्यंत हे दर कायम राहतील असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. एमएसआरडीसी नवीन टोल कंत्राटदार कंपनीच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरच पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या निविदा प्रक्रियेनुसार यासाठीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -