घरताज्या घडामोडीशहीद सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक ट्रस्ट उचलणार

शहीद सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सिद्धिविनायक ट्रस्ट उचलणार

Subscribe

आज शहीद सुनिल काळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांविरोधात लढताना सोलापूर जिल्ह्यातील पानगावचे सीआरपीएफचे जवान सुनिल काळे यांना वीरमरण आले. यामुळे शहीद सुनिल काळे यांच्या कुटुंबियांसह पानगाववर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज त्यांच्या मूळगीव पानगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने शहीद सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, पाच दहशतवादी पुलवामाच्या बंदजू परिसरात लपले असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यामुळे या परिसरात पोलीस आणि सीआरपीएफने शोध मोहिम सुरू केली. त्यादरम्यानच दहशतवाद्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. यावेळेस दहशतवाद्यांशी दोन हात करताना सोलापूर जिल्ह्यातील पानगावचे सुनिल काळे हे धारातिर्थी पडले. मंगळवारी सकाळी ४.३० वाजता झालेल्या चकमकीत सुनिल काळे शहीद झाले.

आज सुनिल काळे यांच्या अंत्यसंस्कारावेळी महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी, जिल्ह्याधिकारी आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात देखील सुनिल काळे यांनी अखेरचा निरोप देण्यासाठी गावकरी जमले होते. यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात होती.

- Advertisement -

हेही वाचा – शहीद सुनिल काळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -