घरताज्या घडामोडीशहीद सुनिल काळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद सुनिल काळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Subscribe

पानगावासह बार्शी तालुक्यात शोककळा पसरली.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांविरोधात लढताना महाराष्ट्राच्या सुपूत्राला वीरमरण आले. पुलवामातील या चकमकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पानगावचे सीआरपीएफचे जवान सुनिल काळे यांना वीरमरण प्राप्त झाले. शहीद सुनिल काळे यांचे पार्थिव आज सकाळी बार्शी तालुक्यातील मूळ गावी पानगावमध्ये दाखल झाले असून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद सुनिल काळे यांच्या कुटुंबियांसह पानगाववर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे.

माहितीनुसार, पाच दहशतवादी पुलवामाच्या बंदजू परिसरात लपले असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यामुळे या परिसरात पोलीस आणि सीआरपीएफने शोध मोहिम सुरू केली. त्यादरम्यानच दहशतवाद्यांनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. यावेळेस दहशतवाद्यांशी दोन हात करताना सोलापूर जिल्ह्यातील पानगावचे सुनिल काळे हे धारातिर्थी पडले. मंगळवारी सकाळी ४.३० वाजता झालेल्या चकमकीत सुनिल काळे शहीद झाले. या वृत्तानंतर कुटुंबियासह पानगाववर दुखाचा डोंगर कोसळला.

- Advertisement -

या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी ३६ ऑपरेशनमध्ये ९२ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर त्यांना मदत करणाऱ्या १२६ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये १५० हून अधिक आणि २०१८ मध्ये २५० हून अधिक अतिरेकी ठार झाले. ठार झालेल्या ९२ दहशतवाद्यांपैकी ३५ दहशतवादी हिजबुलचे आहेत. या संघटनेचा मुख्य कमांडर रियाझ नायकू याच्यासह अनेक कमांडर्सही मारले गेले आहेत.


हेही वाता – भारताला मोठे यश; पूर्ण लडाखमधून सैन्य माघार घेण्यास चीनची सहमती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -