घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमनपा निवडणूक : अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी पुन्हा लांबणीवर

मनपा निवडणूक : अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी पुन्हा लांबणीवर

Subscribe

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदारयाद्यांवर तब्बल ३ हजार ८४७ हरकती आल्याने छाननी आणि मतदार याद्यांचा ताळमेळ बसवण्यात मोठा कालापव्यय होत आहे. प्रशासनाचे काही अधिकारी व कर्मचारी अक्षरश: रात्री ८ वाजेपर्यंत मतदार याद्यांवर काम करीत आहे. तरीही हे काम अटोक्यात येत नसल्याने महापालिकेच्या विनंतीनुसार राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्धीला येत्या २१ तारखेपर्यत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी १६ जुलैला अंतिम मतदार याच्या प्रसिद्ध होणार होत्या.

महापालिका निवडणुकीसाठी ४४ प्रभागनिहाय प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयाद्यांवर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला असून, राज्यातील तिसर्‍या क्रमांकाच्या हरकती पालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत.विक्रमी हरकतींमध्ये सर्वाधिक हरकती या मतदारांच्या प्रभागांच्या अदलाबदली होती.सिडकोत सर्वाधिक २४३३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. तर नाशिक पश्चिम मधून ४६ अशा सर्वात कमी हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आयुक्त रमेश पवार यांनी निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले सर्व विभागीय अधिकारी, नोडल अधिकारी, पर्यवेक्षक, यादी प्रमुख, यादी सहाय्यक, आदी सुमारे ३०० अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक हरकतींच्या चौकशीसाठी ४४ प्रभागांसाठी ४४ पथके स्थापन केली होती.

- Advertisement -

हरकतींची छाननी, प्रत्यक्ष स्थळपाहणी, पंचनाम्याची संपूर्ण प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण होऊन अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.परंतु, ९ जुलै पर्यत हरकतींची चौकशी करणे शक्य नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी १६ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती.त्यामुळे महापालिकेच्या पथकांनी भर पावसात ३,८४७ हरकतींचा चौकशी पूर्ण करत, मंगळवारी निवडणूक उपायुक्तांकडे सादर केला होता.परंतु,या चौकशी अहवालाची छाननी करून त्यांचा कंट्रोल चार्ट वेळेत बनवने शक्य नसल्याने आयोगाकडे प्रशासनाने पुन्हा मुदतवाढ मागीतली होती.त्यानुसार आयोगाने नाशिकसह पिंपरी चिंचवड आणि पुणे या तीन महापालिकांना अंतिम मतदार याद्या प्रसिद्धीसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे या मतदार याद्या आता १६ जुलै ऐवजी २१ जुलै रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती निवडणूक उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी दिली आहे.

भाजप शिष्टमंडळाने घेतली भेट

दरम्यान भाजपचे महानगरप्रमुख गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मतदार यांद्यांवरील हरकती व मतदार याद्यांची मोठ्या प्रमाणावर झालेल्या तोडफोडी संदर्भात घेतलेल्या आक्षेपांबाबत शुक्रवारी (१५) तिसंर्‍यांदा आयुक्त रमेश पवार यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, अलका आहिरे, मुन्ना हिरे, अविनाश पाटील यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक उपस्थित होते.

विभागनिहाय हरकती

  • पूर्व २४४
  • पश्चिम ४६
  • पंचवटी ३९६
  • नाशिकरोड २२२
  • सिडको २४३३
  • सातपूर १५५
  • एकूण ३८४७
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -