घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रMVP Election : पहिला निकाल जाहीर, सेवक पॅनलचे तीन उमेदवार विजयी

MVP Election : पहिला निकाल जाहीर, सेवक पॅनलचे तीन उमेदवार विजयी

Subscribe

माध्यमिक विभागातून जगन्नात मधुकर निंबाळकर आघाडीवर

नाशिक । मविप्र संस्थेच्या सेवक संचालकासाठी झालेल्या निवडणुकीत सेवक पॅनलचे संजय शिंदे विजयी झाले. तर, समर्थ पॅनलचे डॉ. संपत काळे यांना पराभव पत्करावा लागला. प्राथमिक, माध्यमिक विभागातून जगन्नात मधुकर निंबाळकर आणि सी. डी. शिंदे हे दोघेही आघाडीवर आहेत.

सेवक पॅनलच्या वतीने महाविद्यालयीन विभागाचे संजय शिंदे हे विजयी झाले, तर प्राथमिक, माध्यमिक विभागाचे चंद्रजित दयाराम शिंदे आणि जगन्नाथ मधुकर निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. हे दोघेही उमेदवार प्रगती पॅनलचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

- Advertisement -

समर्थ पॅनलच्या वतीने महाविद्यालयीन विभागातून डॉ. संपत काळे, प्राथमिक – माध्यमिक विभागातूून रामराव बच्छाव आणि राजेश शिंदे नशीब आजमावत आहेत. सेवक संचालक निवडणुकीतून अन्य पदाधिकारी आणि संचालकांचा कल स्पष्ट होऊ शकत नाही हे गेल्या निवडणुकीत निदर्शनास आले होते. गेल्यावेळी संपूर्ण प्रगती पॅनल निवडून आले तेव्हा सेवक संचालकांत विरोधी पॅनलमधील संचालकांचे पॅनलही निवडून आले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -