घरदेश-विदेशDefence Minister Rajnath Singh लडाखमध्ये दाखल

Defence Minister Rajnath Singh लडाखमध्ये दाखल

Subscribe

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या दौऱ्यावर लडाखला पोहोचले आहेत. यावेळी ते लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्यासमवेत संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील आहेत. शुक्रवारी लडाख आणि शनिवारी जम्मू-काश्मीरला भेट देतील.

“सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेणार आहे आणि त्या भागात तैनात असलेल्या सैन्य दलाच्या जवानांशी बोलणी करणार आहे,” असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. संरक्षणमंत्री लडाख सेक्टरमध्ये ‘एलएसी’ व काश्मीरमध्ये ‘एलओसी’वरील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज सकाळी त्यांचे लेह विमानतळावर आगमन झालं.

- Advertisement -

या अगोदर जुलै महिन्याच्या सुरुवातीस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेह दौरा करणार होते. मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यानंतर ३ जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांनी लेह जिल्ह्यातील नीमू येथे भेट दिली. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये ५ मे रोजी उफाळलेल्या संघर्षानंतर संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच लडाख दौरा आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -