घरमहाराष्ट्रनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण; धुळ्यातून आणखी दोन जणांना अटक

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण; धुळ्यातून आणखी दोन जणांना अटक

Subscribe

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसने आणखी दोन जणांना धुळ्यातून अटक केली आहे. या आरोपींचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात देखील सहभाग असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे.

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसकडून धडक कारवाई सुरुच आहे. एटीएसने आणखी दोन जणांना अटक केली आहे. स्फोटके बाळगल्याप्रकरणी एटीएसने धुळे जिल्ह्यातल्या साक्री येथून देन जणांना अटक केली आहे. ३२ वर्षीय वासुदेव सुर्यवंशी आणि २९ वर्षाच्या विजय लोधी या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींकडून देखील शस्त्रसाठा आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने दोघांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

आरोपींच्या घरातून शस्त्रसाठा जप्त 

या दोघांचाही दाभोलकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा एटीएसने संशय व्यक्त केला आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील वासुदेव सूर्यवंशी याने गाडी पुरवठा केला असल्याचे एटीएसने सांगिले आहे. एटीएसने या दोघांच्या घरी केलेल्या छापीमारीमध्ये बॉम्ब तयार करण्याचे साहित्या, शस्त्रसाठा आणि वेगवेगळ्या शहरांचे नकाशे जप्त केले आहेत. तर लोधी याच्या घरातून ३ गावठी बॉम्ब, ३ मोबाईल,४ पेन ड्राईव्ह आणि २ नंबर प्लेट जप्त केल्या. तर सूर्यवंशीच्या घरातून १ डीव्हीडी आणि २ मोबाईल जप्त केले. पुण्याच्या सनबर्न फेस्टिवलमध्ये स्फोट घडवून आणण्याचा यांचा कट होता.

आतापर्यंत ७ आरोपींना अटक 

नालासोपारा येथील सोपारा गावात राहणाऱ्या वैभव राऊत याच्या घरावर आणि दुकानावर मुंबई एटीएसने मध्यरात्री छापा टाकून ८ देशी बॉम्ब जप्त केले होते. त्यानंतर एटीएसने वैभव राऊतसह पाच जणांना बेकायदा शस्त्र, स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी विविध कलमांनुसार अटक केली. वैभव राऊतला सर्वात आधी पोलिसांनी अटक केली. या तपासा दरम्यान पोलिसांनी सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकरला आणि शरद कळसकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता धुळ्यातून दोन जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी स्फोट घडवण्याचे षडयंत्र यांनी रचले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -