घरमहाराष्ट्रनागपूरNana Patole : नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्ची अन् भ्रष्टाचारी नेते...

Nana Patole : नवाब मलिक देशद्रोही मग इक्बाल मिर्ची अन् भ्रष्टाचारी नेते फडणवीसांना कसे चालतात? पटोलेंचा सवाल

Subscribe

नागपूर : माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत. त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत, मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) साथीदार इक्बाल मिर्चीशी (Iqbal Mirchi) संबंधीत प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि भ्रष्टाचारी अजित पवार (Ajit Pawar) फडणवीस यांना कसे चालतात? असा सवाल करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे. अशा नकली देशप्रेमाची नौटंकी महाराष्ट्रात चालणार नाही. (Nana Patol Nawab Malik is a traitor then how are Iqbal Mirchi Praful Patel and corrupt ajit pawar leaders doing to devendra Fadnavis)

हेही वाचा – Nana Patole : नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या 40 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

- Advertisement -

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले की, नवाब मलिकांना दाऊदशी संबंधीत असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आपण किती देशप्रेमी आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून ते पत्र ट्वीटही केले, पण दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्चीचा साथीदार खासदार प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस यांना कसे चालतात? ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे घरही जप्त केलेले आहे, मग प्रफुल्ल पटेलांबद्दल फडणवीस यांची भूमिका काय? ते फडणवीसांनी जाहीर करावे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमशी संबंधित एक व्यक्ती देशद्रोही तर मग दुसरा व्यक्ती देशप्रेमी आहे का? असे सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केले.

हेही वाचा – Ajit Pawar : कांदा, दूध अन् इथेनॉल बंदीच्या प्रश्नावर विरोधकांचे टीकास्त्र; अजित पवार म्हणतात केंद्राशी चर्चा करू

- Advertisement -

जनता नकली देशभक्तांना धडा शिकवेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर चार दिवसातच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले, भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अजित पवार फडणविसांना कसे चालतात? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी नौटंकी चालत नाही. जनताच अशा नकली देशभक्तांना धडा शिकवेल, असेही नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -