घरताज्या घडामोडीNana Patole on PM : नाना पटोलेंविरोधात नाशिक, भंडारा, नागपूरमध्ये भाजपकडून तक्रार...

Nana Patole on PM : नाना पटोलेंविरोधात नाशिक, भंडारा, नागपूरमध्ये भाजपकडून तक्रार दाखल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त विधान केल्या प्रकरणात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाना पटोले यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये नाना पटोले हे मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो, असे वक्तव्य करताना दिसत आहे. या व्हिडिओतील भाषेवर महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत भाजपच्या नेत्यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. याच प्रकरणात गुन्हा दाखल करत नाना पटोलेंविरोधात सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. नाना पटोलेंनी केलेल्या विधानाचा भाजप नेत्यांनी निषेध करत टीका केली आहे. या प्रकरणात भंडारा आणि नागपूरमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिकसोबतच भंडारा गोंदिलायेच भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनीही नाना पटोले यांच्याविरोधात भंडारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करून घेतली असून चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल झाला नाही, तर कोर्टात धाव घेऊ असे सुनील मेंढे यांनी सांगितले.

नाना पटोलेंचे हेच ते विधान

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटच्या दिवशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले होते.

- Advertisement -

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा आहे. नाना पटोले म्हणतात की, ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.’ नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर भाजपच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

नागपूरमध्येही विधान परिषेदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंविरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच नाना पटोलेंना अटक करण्याचीही मागणी नागपूर भाजपकडून करण्यात आली आहे. नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाजपच्या दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींपासून ते नारायण राणे यांनीही या भाषेवर आक्षेप घेतला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणात नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -