घरमहाराष्ट्रजनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करतंय, नाना पटोलेंची टीका

जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करतंय, नाना पटोलेंची टीका

Subscribe

महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्नांवर काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील ईडी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्रातील मोदीचे आणि राज्यातील ईडीचे सरकार करत आहे. आज बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे झाले नाहीत. शेतकऱ्यांना मदत केली नाही. बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला. या सगळ्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी काँग्रेसचा भूमिकेला दाबण्याची कूमशाही चालली आहे. त्या विरोधात आमची भूमिका आहे, असे नाना पटोले म्हणाले.

जनतेच्या प्रश्नावर आम्ही मागे येणार नाही –

- Advertisement -

आपण पाहिलेत आम्ही विधान भवनातून बाहेर निघतोय आजून आम्ही आंदोलना सहभागी झालेलो नाही. पण ज्या पद्धतीने हे ईडी सरकार हूकशाही करत आहे. ते सगळे राज्य देश बघतो आहे. हे आम्ही खपवून घेनार नाही. जनतेच्या प्रश्नात एक इंच सुद्धा आम्ही मागे येणार नाही. जनतेचे प्रश्न आम्ही लढनार आणि या देशातील आणि राज्यातील जनतेला न्याय मिळवून देणे हीच भूमीका काँग्रेसची आहे. आम्ही लढत राहू.

पोलीस ईडी सरकारच्या दबावात –

- Advertisement -

पोलीस ईडी सरकारच्या आणि केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकारच्या दबावात आहेत. लोकसभेत प्रधानमंत्री शेतकरी हक्कासाठी तीन काळ्या कायद्या विरोधात लढतात त्यांना आंदोलन जीवी म्हणतात, असे नाना पटोले म्हणाले. यावेळी त्यांनी जनतेचे बेहाल राज्यातील आणि केंद्रातील सरकारमुळे झाले आहेत. त्यावर आवाज उचलायला आम्ही जातो आहे. मात्र, हे पोलीस आढवे होत आहेत. मी यांना विनंती करतो तुम्ही जनतेचे नोकर आहात. या ईडी सरकारचे नाही. जनतेच्या घामाच्या पैशाने तुम्ही पगार घेता. जनतेसाठी तुम्ही पण आमच्या सोबत या, असे आमचे आवाहन, असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -