…म्हणून मी मोदींना मारू शकतो, नाना पटोलेंच्या वादग्रस्त विधानानं खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी हे वक्तव्य केलं नाही. तर गावगुंड असलेल्या मोदीबाबत वक्तव्य केलं आहे. योगायोगाने त्या गावगुंडाचे नावसुद्धा मोदी निघालं असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं आहे. 

congress leader nana patole Criticism on narendra modi over migrants worker and Namaste Trump
मजूर वॉरियर अन् नमस्ते ट्रम्प करणारे मोदीच कोरोना स्प्रेडर, नाना पटोलेंची टीका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. म्हणून मी मोदींना मारु शकतो असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप नेत्यांकडून नाना पटोलेंवर टीकास्त्र डागण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यातील जेवनाळामधील प्रचार सभेनंतर नाना पटोले कार्यकर्त्यांशी संवाद साधता होते. यावेळी त्यांनी मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे विधान केलं आहे. परंतु नाना पटोले यांनी हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलं आहे का याबाबत अद्याप काँग्रेसकडून काही स्पष्टीकरण आले नाही.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वक्तव्य केलं आहे की, “मी का भांडतो, मी आता गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. या एवढ्या सगळ्या शाळा, कॉलेज काढून एका किंवा दोन पिढीचा उद्धार करतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली… ठेकेदारी घेतली नाही. लोकांना वाटून टाकतो म्हणून मी मोदीला मारु शकतो. त्याला शिव्या देऊ शकतो. मोदी म्हणेल माझ्या विरोधात प्रचाराला आला. प्रामाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे. त्याला तुम्ही पैसे वाटतात त्याला रणनितीमध्ये फसवत असतात”, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

नाना पटोलेंची वक्तव्यावर प्रतिक्रिया 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, व्हायलर होणाऱ्या व्हिडीओमध्ये कार्यकर्ते मला तक्रार करत होते. की गावगुंड मोदी वारंवार त्रास देत आहेत. यावर त्यांना सांगितले की, मी मोदींना मारु शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी हे वक्तव्य केलं नाही. तर गावगुंड असलेल्या मोदीबाबत वक्तव्य केलं आहे. योगायोगाने त्या गावगुंडाचे नावसुद्धा मोदी निघालं असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं आहे.

काय आहे प्रकरण 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पटोले यांनी मोदींना मारु शकतो असे वक्तव्य केलं आहे. नाना पटोले कार्यकर्त्यांच्या घोळक्यामध्ये उभे आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मी गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहे. प्रामाणिक काम करत आहे. कोणतीही ठेकेदारी घेतली नाही.. लोकांना वाटून टाकतो म्हणून  मी मोदींना मारु शकतो असे नाना पटोले कार्यकर्त्यांना सांगताना व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहेत.


हेही वाचा : संतोष परब हल्ला प्रकरण: नितेश राणेंना अटकेपासून तूर्तास दिलासा; सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टाच्या निकालाला देणार आव्हान