घरमहाराष्ट्रपक्षश्रेष्टींच्या सूचनेवरुन राजीनामा दिला - नाना पटोले

पक्षश्रेष्टींच्या सूचनेवरुन राजीनामा दिला – नाना पटोले

Subscribe

नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षश्रेष्टींच्या सूचनेवरुन राजीनामा दिला, असं सांगितलं. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत माहिती नसल्याचं नाना पटोले म्हणाले. याशिवाय, शरद पवारांच्या काँग्रेसच्या अंतर्गत दबावामुळे अध्यक्ष बदलावा लागल्याच्या वक्तव्यावर भाष्य करणं टाळलं. दरम्यान, नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंचं नाव निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाना पटोले यांनी विधानसभा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली होती. जनतेची सेवा करण्याची संधी मला दिली. आज पक्षश्रेष्टींनी मला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. मी कार्यकर्ता म्हणून राजीनामा दिला. एक वर्ष मी जनतेची खुर्ची बनवली याचा मला आनंद आहे. म्हणून मी खूप आनंदी आहे,” असं नाना पटोले म्हणाले. शिवाय, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबतच्या सूचना, आदेश मला मिळाले नाहीत. पक्ष काय जबाबदारी देईल हे मला माहित नसल्याचं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – नाना पटोलेंनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा


सत्ता समतोलासाठी काँग्रेसला हवं उपमुख्यमंत्रिपद

आघाडी सरकारमध्ये दुय्यम स्थान मिळत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. त्यामुळे सत्ता समतोल साधण्यासाठी काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. काँग्रेसची ही मागणी मान्य झाल्यास विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबदल्यात शिवसेनेला काँग्रेससाठी एक मंत्रिपद द्यावं लागेल.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -