घरताज्या घडामोडी'या मुर्खांना कोणी विकत घेतलं?', अमांडा सर्नीचा भारतीय सेलिब्रिटींवर निशाणा

‘या मुर्खांना कोणी विकत घेतलं?’, अमांडा सर्नीचा भारतीय सेलिब्रिटींवर निशाणा

Subscribe

अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने शेतकरी आंदोलनाला दर्शवला पाठिंबा

मागील दोन महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन केलं जात आहेत. या आंदोलनाला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींनी विरोध केला आहे. आता याप्रकरणामध्ये इंटरनॅशनल कलाकार देखील सामील झाले आहेत. अनेक इंटरनॅशनल कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ट्विट केलं आहे. त्यामुळे सध्या भारतीय कलाकार आणि इंटरनॅशनल कलाकारांमध्ये ट्विटवर शाब्दिक वार होताना दिसत आहेत. बॉलिवूडमधील अक्षय कुमार, अजय देवगण करण जोहर, क्रिकेटर सचिन तेंडूलकर, विराट कोहली यांनी ट्विट करून शेतकरी आंदोलनासंदर्भातील इंटरनॅशनल कलाकार चुकीचा प्रचार करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्गनंतर आता अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. पण तिने आता पुन्हा ट्विट करून बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

भारतीय सेलिब्रिटींनी इंटरनॅशनल कलाकार चुकीचा प्रचार करत असल्याचं म्हटल्यावर अमांडा सर्नीने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमांडाने ट्विट करू म्हटलं आहे की, ‘ज्यांनी हा प्रपोगंडा लिहिला आहे, या मुर्खांना कोणी विकत घेतलं आहे? पूर्णपणे संबंध नसलेले सेलिब्रिटी भारत तोडण्याचा कट रचत आहेत आणि याच्यासाठी त्यांना पैसे मिळाले आहेत? काहीतरी विचार करा. किमान हे तरी वास्तविक ठेवलं असतं.’ अशाप्रकारे अमांडाने सेलिब्रिटींना उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

दरम्यान अमेरिकन पॉपस्टार रिहाना, सामाजिक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि अभिनेत्री मिया खलीफासारखे अमांडा सर्नीने इन्स्टाग्रामवर आपलं मत मांडलं होत. अमांडाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘जग पाहत आहे. तुम्हाला मुद्दा समजण्यासाठी भारतीय किंवा पंजाबी किंवा दक्षिण आशियाई असणं गरजेचं नाही आहे. आपण फक्त मानवतेचे समर्थक असलं पाहिजे. प्रत्येक वेळेस अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, प्रेसचे स्वातंत्र्य, समानता आणि कामगारांचा सन्मान यासारख्या मूलभूत नागरी हक्कांची मागणी केली पाहिजे.’


हेही वाचा – ‘धोबी का कुत्ता, घर का ना घाट का’ म्हणत रोहितवर कंगना भडकली


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -