घरमहाराष्ट्रकोकणात नाणार रिफायनरी होणारच; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ग्वाही

कोकणात नाणार रिफायनरी होणारच; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ग्वाही

Subscribe

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यावरून विरोधक आणि शिंदे सरकारमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच कोकणातील रिफायनरी प्रकल्प राहणार की जाणार, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता कुठल्याही परिस्थितीत नाणार रिफायनरी प्रकल्प ठरलेल्या ठिकाणीच होणार. या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी दिली. सोबतच संबंधित कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याची माहितीदेखील नारायण राणे यांनी दिली आहे.

हेही वाचा – दसरा मेळावा! दोन्ही गटांत शिवतीर्थासाठी चुरस; शिवाजी पार्क कोण गाजवणार?

- Advertisement -

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प मागील 7 वर्षांपासून चर्चेत आहे. पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्यावरून ग्रामस्थांनी कडाडून विरोध केल्यामुळे हा प्रकल्प बारगळला. त्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच परंतु नाणार ऐवजी बारसू गाव परिसरातील १३ हजार एकरवर उभारण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला होता. या प्रस्तावाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी सांगितले की, रिफायनरी नाणारमध्येच राहावी यासाठी मी स्वत: मंत्र्यांना भेटलो आहे. ते संबंधित कंपनीशी पुन्हा चर्चा करत आहेत. हीच जागा आम्ही कंपनीला द्यायला तयार आहोत. नाणार रिफायनरी कोकणातच होणार. यापुढे कुणाचाही विरोध चालू देणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -