घरताज्या घडामोडीजन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे मुंबईत, १९ भाषणांचा भरगच्च कार्यक्रम

जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे मुंबईत, १९ भाषणांचा भरगच्च कार्यक्रम

Subscribe

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले नारायण राणे आजपासून दोन दिवसाच्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त मुंबईत आहेत. संपुर्ण दोन दिवस असा मुंबईतला राणेंचा भरगच्च असा कार्यक्रम आहे. या दोन दिवसाच्या जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणे हे जवळपास १९ ठिकाणी भाषण करणार आहेत. आज बुधवारी सकाळी दहा वाजता नारायण राणे हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतील. माहीम कोळीवाडा ते मालाडच्या पठाणवाडी जंक्शन असा पश्चिम उपनगरातील तसेच दक्षिण मुंबईतील असा दिवसभराचा नारायण राणे यांचा दौरा आहे. या संपुर्ण यात्रेदरम्यान नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे स्मारकालाही भेट देणार आहेत. तसेच मुंबईतील मराठमोळ्या वस्तीच्या भागातही नारायण राणे यांचा दौरा आहे. नारायण राणे यांच्या दौऱ्याची समाप्ती मालाड येथे गुरूवारी रात्री होईल.

कसा आहे नारायण राणेंचा दौरा

नारायण राणे मुंबई आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हार घालतील. त्यानंतर टिचर्स कॉलनी येथे नारायण राणे यांचे भाषण असेल. माहीम कोळीवाडा, माहीम दर्जा आणि कापड बाजार असा नारायण राणे यांचा प्रवास सुरू होईल. त्यानंतर नारायणे राणे हे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देतील. त्यापाठोपाठच चैत्यभूमी आणि सिद्धीविनायक मंदिर, प्रभादेवी, फुल विक्रेता संघ, रवींद्र नाट्य मंदिर असा सकाळच्या सत्रातला दौरा आहे. त्यानंतर दुपारी ते वरळीच्या जांभोरी मैदानात बीडीडी चाळींचा दौरा करतील. वरळी नाका येथे भिवंडीवाला चाळ येथे नारायण राणेंचे भाषण असेल.

- Advertisement -

मराठमोळ्या वस्तीतला दौरा 

मुंबईतील परळ भागात दुपारी वाजता टाटा, केईएम हॉस्पिटल त्यानंतर भोईवाडा जंक्शन येथे नारायण राणे यांचे भाषण असेल. त्यानंतर सायन येथे सायन कोळीवाडा – सायन हॉस्पिटल, सायन सर्कल येथे नारायण राणेंचे भाषण असेल. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नारायण राणे यांचा दौरा हा लालबाग परिसरात असेल. गणेश टॉकिज, लालबागचा राजा येथे नारायण राणे यांचे सायंकाळी ६ वाजता भाषण असेल. त्यानंतर सात रस्ता, आग्रीपाडा, नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, ऑपेरा हाऊस, हुतात्मा चौक, गिरगाव चौपाटी असा दौरा सायंकाळच्या सुमारास सुरू होईल. तसेच गिरगाव चौपाटी येथे शहीद तुकाराम ओंबळे स्मारक येथे ते हार अर्पण करतील. त्यानंतर ८.३० वाजता स्वामी नारायण मंदिर – महालक्ष्मी मंदिर येथे संतांसोबत त्यांची चर्चा आहे. त्यानंतर पहिल्या दिवसाचा दौरा संपेल.

दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याअंतर्गत विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथून दौऱ्याला सुरूवात होईल. त्यानंतर नवघर रोड, मुलुंड, भांडूपचे कोकण नगर, मंगतराम पेट्रोल पंप, आयआयटी पवई, मजास तलाव येथे त्यांचे भाषण असेल. त्यापुढील दौरा हा गोरेगाव, चिंचोली बंदर, भाजप जिल्हा कार्यालय (कांदिवली), चारकोप मार्केट, देवीपाडा, टाटा पॉवर हाऊस, समता नगर, रानी सती मार्ग (पठाणवाडी जंक्शन) येथे समारोपाचे भाषण होईल.

- Advertisement -

हे ही वाचा –Afghanistan: काबुलमधून भारतीयांच्या सुटकेसाठी मराठमोळ्या श्वेताचे धाडसी कर्तव्य


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -