घरताज्या घडामोडीनारायण राणेना अटक, २० वर्षात केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची पहीली घटना, काय...

नारायण राणेना अटक, २० वर्षात केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची पहीली घटना, काय आहे कायदा?

Subscribe

२० वर्षांत एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्याची ही पहीलीच घटना ठरली आहे. यामुळे राज्य सरकार केंद्रीय मंत्र्याला अटक करू शकते का? यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. राणे हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. राणे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात  जुलै महिन्यात वर्णी लागली होती. मात्र २० वर्षांत एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक झाल्याची ही पहीलीच घटना ठरली आहे. यामुळे राज्य सरकार केंद्रीय मंत्र्याला अटक करू शकते का? यावर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. यामुळे देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी कायदेशीर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. भारतीय दंड संहीतेच्या कलमानुसार नियमांचे उल्लंघन करण्यावर कारवाई केली जाते.

- Advertisement -

पण उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, गव्हर्नर,राष्ट्रपती, निवडणूक आयुक्त, युपीएससीचे चेयरमन यासारख्या संविधानिक पदावरील व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. पण मंत्री या विशेषाधिकार श्रेणीत येत नाहीत. त्यांना अटक झाल्यानंतर संविधानाचा अवमानही होत नाही. यामुळे राणे यांना सहज अटक करण्यात आली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या एका पथकाला कोकणात चिपळून येथे पाठवण्यात आले. जनआशिर्वाद यात्रेसाठी राणे चिपळूणमध्ये आले होते.

- Advertisement -

१५ ऑगस्टला ठाकरे यांनी देशाच्या स्वांतत्र्यदिनावरून भाष्य केले होते. त्यावरूनच राणे यांनी ठाकरे यांना लक्ष्य केलं. ठाकरेंना स्वातंत्र्यदिनाला किती वर्ष झाले हे माहित नाही. म्हणून भाषणावेळी ते सतत मागे बघून कोणाला तरी विचारत होते. मुख्यमंत्र्याचे हे वागणे बरोबर नाही मी जर तिथे असतो तर त्यांच्या कानाखाली मारलं असते. असे खळबळजनक विधान राणे यांनी केले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून आज मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. ,संतप्त शिवसैनिकांनी राणे यांच्या जुहू येथील घऱाबाहेर जोरदार निदर्शने केली.

तसेच काहींनी कोंबडी छोडो आंदोलन करत राणेंवर निशाणा साधला. यादरम्यान, राणेंना अटक होण्याच्या चर्चा रंगत गेल्या. यामुळे हवालदिल झालेल्या राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. पण रत्नागिरी सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. तर तत्काळ सुनावणी करता येणार नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे राणे यांची अटक अटळ होती. त्यानंतर संगमेश्वर येथे नारायण राणेंना ताब्यात घेण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -