घरदेश-विदेशकेसांच्या नमुन्यामुळे अभिनेत्रींनी ड्रग्ज घेतल्याचे झाले उघड; दोन मोठी नावं अडचणीत

केसांच्या नमुन्यामुळे अभिनेत्रींनी ड्रग्ज घेतल्याचे झाले उघड; दोन मोठी नावं अडचणीत

Subscribe

दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री संजना गलरानी आणि अभिनेत्री रागिनी द्वीवेदी बंगळुरू ड्रग्स घोटाळा प्रकरणात अडचणीत आहेत. गेल्या वर्षी दोघांनाही बंगळुरू ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. यानंतर, या प्रकरणाच्या तपासात या अभिनेत्री वाईटप्रकारे अडकल्या. जरी दोन्ही अभिनेत्रींची नंतर जामिनावर सुटका झाली, पण आता जवळपास एक वर्षानंतर, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामुळे या प्रकरणातील खळबळ अधिक वाढली आहे. मागील वर्षी या दोन्ही अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर ड्रग्ज विश्वाशी चित्रपट वर्तुळाचं नातं धक्कादायकरित्या समोर आलं होतं.

दरम्यान, एफएसएल अहवालातून असे समोर आले की, संजना गलराणी आणि रागिनी द्विवेदी या दोन्ही अभिनेत्रींनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं कळत आहे. मात्र, सीएफएसएल अहवालाबाबत तिला काहीच माहिती नसल्याचे संजना गलराणी हिने सांगितले. सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, संजना गलराणी, रागिनी द्विवेदी आणि इतरांनी ड्रग्जचे सेवन केले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही अभिनेत्रींची सध्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दोघांच्या केसांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी माजी दिवंगत मंत्र्याचा मुलगा इव्हेंट मॅनेजर विरेन खन्ना आणि बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा निकटवर्तीय आदित्य अल्वा यांनाही अटक केली आहे.

- Advertisement -

संपूर्ण प्रकरण पुन्हा समोर आल्यानंतर सर्व आरोपींनी पुन्हा एकदा स्वतःला निर्दोष घोषित केले आहे. ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेच्या अहवालात असे म्हटले की, सीएफएसएलने आपल्या तपास अहवालात स्पष्टपणे सांगितले, संजना गलराणी, रागिनी द्विवेदी, वीरेन खन्ना, राहुल टोन्से आणि दोन्ही इव्हेंट मॅनेजर ड्रग्ज वापरत होते. ड्रग्ज प्रकरणी सीसीबी तपास करत आहे. नशा येणाऱ्या औषधांचं सेवन केल्या प्रकरणी सीसीबीनं संजना आणि रागिनीच्या केसांचे सँपल चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. या चाचणीसाठी पाठवण्यात आलेले केसांचे सँपलं सर्वप्रथम नाकारण्यात आले होते. मात्र नंतर चाचण्यांच्या आणि अहवालांचा वेग वाढवण्यासाठी नऊ महिन्यांपूर्वी केसांचेही नमुने घेण्यात आले होते.


डेल्टा व्हेरिएंट ठरू शकतो कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण; ‘या’ लक्षणांपासून रहा सतर्क

 

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -