घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे यांचा जळून मृत्यू

नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे यांचा जळून मृत्यू

Subscribe

नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे यांचा कारमध्ये जळून मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडल्याचे ासमोर आले आहे. वाजे या मोरवाडी रुग्णालयात कार्यरत होत्या. गेल्या तीन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्या मिसिंग असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती.तेव्हापासून नाशिक पोलीस त्यांचा शोध घेत होते. यादरम्यान गौळणे य़ेथे मंगळवारी रात्री ९ ते १० च्या. दरम्यान मिलिट्री गेटसमोर त्यांची जळालेल्या अवस्थेत गाडी सापडली असून त्यात जळून कोळसा झालेली हाडे सापडली आहेत . प्राथमिक तपासात ती हाडे  सुवर्णा वाजे यांचीच असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यामागे घातपाताची शक्यता वर्तवली जात असून याप्रकरणी नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -