घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये ४४ कोटींची प्रकरणे निकाली

नाशिकमध्ये ४४ कोटींची प्रकरणे निकाली

Subscribe

जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालतीत प्रकरणांचा निपटारा

नाशिक : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणतर्फे जिल्ह्यात शनिवारी (दि.११) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत हजारो प्रलंबित व दावा दाखल पूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून ४४ कोटी ७६ लाख ५२ हजार ४४९ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. जिल्ह्यात शनिवारी सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या लोकअदालतीत प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
या लोकअदालीत १६ हजार २११ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी दोन हजार ५९२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तर एक लाख २९ हजार ६३२ दावा दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १४ हजार ८७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्याचप्रमाणे वाहतूक शाखेने बेशिस्त चालकांना ई चलन मार्फत केलेला दंडही वसूल करण्यात आला. त्यात ११ हजार ४८६ प्रकरणांमधून ६० लाख ३५ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या लोकअदालतीत एकूण १६ हजार ६७९ प्रकरणांचा निपटारा झाला असून त्यातून ४४ कोटी रुपयांहून अधिक तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायीक अधिकारी, वकील व पक्षकारांचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शिवाजी इंदलकर व  जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी मानले.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -