घरमहाराष्ट्रनाशिकप्रत्येक प्रभागातील विकासकामांसाठी ५ कोटींच्या कामांना मंजूरी

प्रत्येक प्रभागातील विकासकामांसाठी ५ कोटींच्या कामांना मंजूरी

Subscribe

शासकीय मेेडिकल कॉलेजसाठी जागा हस्तांतरणालाही महासभेची मंजुरी

आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरणाला महासभेेने अखेर मंजुरी दिली. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या विशेष अंदाजपत्रकीय महासभेत विविध विषयांवर चर्चा झाली.

शहरातल्या विकासकामांना गती मिळावी, यासाठी प्रत्येक प्रभागाला ५ कोटींचा निधी देण्याचा निर्णय महासभेने घेतला. निविदा प्रक्रिया सुरू झालेल्या मात्र टेंडर बाकी असलेल्या कामांना यात प्राधान्य दिलं जाणार आहे.

- Advertisement -

सभागृह नेतेपदी कमलेश बोडके

महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कमलेश बोडके तर गटनेते पदावर अरुण पवार यांची नियुक्ती केली जात असल्याचं महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहीर केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -