घरमहाराष्ट्रनाशिकशौचालय खुले करण्यासाठी 'आप'ने वाजवली "पुंगी"

शौचालय खुले करण्यासाठी ‘आप’ने वाजवली “पुंगी”

Subscribe

सातपूर : येथील प्रबुद्धनगर परिसरात पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेले शौचालय तयार होऊनही वर्षभरापासून बंद आहे. यामुळे येथील नागरिकांची विशेषतः महिलांची कुचंबना होते आहे. या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने सातपूर विभागीय कार्यालयासमोर पुंगी बजाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या मानसिकतेचा निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनाची दखल घेत विभागीय मुख्य अधिकारी जयश्री बैरागी यांनी तातडीने सदर शौचालय तातडीने खुले करण्याचे आदेश दिले.

देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांमध्ये ‘हर घर शौचालय’ योजनाही राबविण्यात येत आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला येणार्‍या नाशिकमध्ये महिलांसाठी शौचालये उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. यासाठी आपकडून वर्षभरापासून पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. प्रबुद्धनगरात सुमारे २३ लाख खर्चून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले. एवढा खर्च करून बांधण्यात आलेले हे शौचालय काम पूर्ण होऊनही बंद आहे. याच्या निषेधार्थ आपने जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोर पुंगी बजाओ आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

या आंदोलनाची दखल घेत विभागीय अधिकार्‍यांंनी सदरचे शौचालय सुरू करून देण्यासंदर्भात पत्र दिले. यावेळी कार्याध्यक्ष राजेंद्र गायधनी, सचिव जगवीर सिंग, संघटन मंत्री विनायक येवले, विलास देसले, सातपूर विभाग अध्यक्ष समाधान अहिरे, उपाध्यक्ष पंकज निकम, संदीप बनसोडे, भूषण पाटील, माधुरी खरे, सतीश सांगळे, सतीश आस्वले, सिडको महिला विभाग प्रमुख अ‍ॅड. नीलम बोबडे, मध्य पश्चिम संपर्कप्रमुख अलका सोनवणे, कुलदीप कौर, मीना अहिरे, ज्योती अहिरे, कुसुम अय्यर, शालिनी वाघ, योगेश कायस्थ, अ‍ॅड. राजेंद्र हिंगमिरे, नितीन भालेराव, रघुनाथ चौधरी, अक्षय अहिरे, विनोद कळमकर, सुरज अकोलेकर, सोमेश गायकवाड, दिनकर पवार, नरेंद्र मुठे, नूतन कोरडे, सुरज पुरोहित, राज कुमावत अमित यादव, जगदीश भापकर, प्रसाद घोटेकर, निवृत्ती अहिरे, संजय वाठोरे, अमर पवार, गोविंद स्वामी, गणेश खरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -