घरमहाराष्ट्रनाशिकमॉल्सवर पुन्हा येणार निर्बंध

मॉल्सवर पुन्हा येणार निर्बंध

Subscribe

सोमवारच्या बैठकीत घेणार निर्णय

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना नव्या डेल्टा पल्स विषाणूचा धोका आणि संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका यामुळे संपूर्ण राज्यात तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. नाशिकमध्ये अगोदरच तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. मात्र चारच दिवसांपूर्वी परवानगी देण्यात आलेल्या मॉल्सवर पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सोमवारी होणार्‍या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

शासनाकडून गुरूवारी पॉझिटिव्हीटी दर जाहीर करण्यात आला त्यानूसार नाशिकचा पॉझिटिव्हीटी दर हा २.८ टक्के आहे. शासनाने ४ जून रोजी दिलेल्या निर्देशानूसार जिल्हा पहिल्या टप्प्यात येत असला तरी, ग्रामीण भागात वाढती रूग्णसंख्या विचारात घेता सध्या तरी नाशिकमध्ये तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र सोमवार (दि.२१) पासून मॉल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. पण आता पुन्हा त्यांचं शटर डाऊन होणार आहे. ऩव्या डेल्टा व्हेरिअंटची दहशत आणि संभाव्य तिसर्‍या लाटेची भीती या पार्श्वभूमीवर सरकारनं नवे निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पाचपैकी पहिले दोन वर्ग रद्द करत असल्याचे सरकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे. तिसर्‍या वर्गात मॉल आणि थिएटर्सना मनाई आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्हीटी दर किती कमी झाला आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता कितीही वाढली, तरी मॉलमध्ये फिरायला जाण्याचे किंवा थिएटरमध्ये सिनेमा पाहायला जाण्याचे स्वप्न आणखी काही काळ गुंडाळूनच ठेवावे लागणार आहे.

शासनाने संपूर्ण राज्यातच तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध लागू केले आहेत. नाशिक जिल्हयाचा पूर्वीपासूनच तिसरा टप्पा लागू आहे. मॉल्सबाबत सोमवारी बैठकीत निर्णय घेतला जाईल.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -