घरक्राइमअंबड खून प्रकरण : कर्डेल यांच्या पुतण्यानेच घेतला वृद्ध काकाचा बळी

अंबड खून प्रकरण : कर्डेल यांच्या पुतण्यानेच घेतला वृद्ध काकाचा बळी

Subscribe

नाशिक : अंबडलिंक रोडवरील कर्डेल मळा येथे वृद्धाचा डोक्यात अभडधोबड शस्त्राने डोक्यात वार करत निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. सदर गुन्ह्याचा उलघडा करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. या गुन्ह्यात मयत कर्डेल यांच्या पुतण्यासह एका अल्पवयीन बालकास ताब्यात घेतले आहे. सागर कर्डेल असे अटक केलेल्या पुतण्याचे नाव आहे.

बच्चू सदाशिव कर्डेल यांच्या घरामध्ये चूलत भावाच्या मुलाच्या हळदीचा कार्यक्रम असल्याने रात्रीच्या सुमारास त्यांचे घरातील सर्व कुटुंबीय हळद समारंभास गेले होते. या संधीचा फायदा घेत बच्चू कर्डेल घरात एकटेच असल्याची पूर्ण माहिती असल्याने संशयित आरोपी त्यांचा पुतण्या सागर कर्डेल याने एका १७ वर्षीय अल्पवयीन बालकाच्या मदतीने आपल्याच काकांचा खून केला असल्याचे पोलीस तपासात उघड आले आहे. खून केल्यानंतर घरातील पैसे ठेवलेली कोठी पळवून नेत दरोड्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या संदर्भात संशयित आरोपी सागर कर्डेल यास अटक केली असून विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. सागर कर्डेल याने काकाचा कोणत्या कारणातून खून केला, याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -