घरदेश-विदेशदेवीने कौल दिला, 'या' दिवशी होणार आंगणेवाडीची जत्रा

देवीने कौल दिला, ‘या’ दिवशी होणार आंगणेवाडीची जत्रा

Subscribe

सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची म्हणजेच ‘आंगणेवाडीची जत्रा’ची तारीख निश्चित झाली आहे. देवीचा कौल मिळाला असून, शनिवार, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी भराडी देवीचा उत्सव होणार आहे. या उत्सवासाठी महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातील लाखो भाविक येत असतात. त्यामुळे या देवीच्या वार्षिकोत्सवाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं.

नवासाला पावणारी देवी म्हणून भराडी देवीची ओळख आहे. या देवीच्या वार्षिकोत्सवात आंगणेवाडीची जत्रा असते. लाखो भाविकांच्या गर्दी या देवीची जत्रा रंगते. केवळ दीड दिवसांच्या असलेल्या यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. यामध्ये कलाकार, राजकारणी मंडळींचाही समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आंगणेवाडी, कुणकेश्वर जत्रोत्सवाबाबत कुणीही आरोप- प्रत्यारोप करुन गैरसमज पसरवू नये, पालकमंत्र्यांचे आवाहन

कुठे असते आंगणेवाडीची जत्रा

- Advertisement -

मालवण तालुक्यात ही आंगणेवाडीची जत्रा भरते. मसुरे गावात आंगणेवाडी नावाची एक वाडी आहे. तिथे भराडी देवी विराजमान आहे. माळरान म्हणजेच भरडावर ही देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव भराडी देवी आहे. ही देवी आंगणेवाडीत विराजमान आहे म्हणून या देवीच्या वार्षिकोत्सव महोत्सवाला आंगणेवाडीची जत्रा असंही म्हणततात.
खरंतर, भराडी देवीचं मंदिर हे आंगणे कुटुंबीयांचं खासगी मंदिर आहे. परंतु, या देवीची ख्याती जगभर असल्याने सर्वांसाठी दर्शन खुले असते.

देवीचा कौल लावून ठरवली जाते तारीख

आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कुठच्या तिथी अथवा वारानुसार ठरलेली नाही. देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख ठरवली जाते. यात्रा दीड ते दोन दिवस चालते. पण या जत्रेची लगबग देवदिवाळीपासून सुरू होते. देवदिवाळीच्या दुसर्‍या दिवशी डाळप (डाळमांजरी) होते. तिसर्‍या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात. ते मानकरी वंशपरंपरागत असले तरी दरवर्षी चार नवीन मानकरी निवडले जातात. मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी…’’ असे गार्‍हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. बहुतांश वेळा डुकराची शिकार केली जाते. ‘पारध’ मिळाले की वाजतगाजत देवीसमोर आणले जाते. मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. यानंतर देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवली जाते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -