घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरी येथील तळेगाव शिवारात डांबराच्या ट्रकला आग

इगतपुरी येथील तळेगाव शिवारात डांबराच्या ट्रकला आग

Subscribe

मुबंईहून नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर मुबंईहून नाशिकला जाणारी ट्रक डांबर (केमिलक) भरलेली (एमएच 03-सीव्ही ८५७६ )या वाहनाला कसारा घाट चढून आली असता तळेगाव शिवारात अचानक धूर निघत असल्याने वाहन चालकाने रस्त्याच्या कडेला गाडी लावून प्रसंगावधान दाखवत गाडी उभी केली. काही वेळेतच सायंकाळी सातच्या दरम्यान गाडीने अचानक पेट घेतल्याने वाहन चालक व क्लिनरने ट्रकमधून उड्या मारल्याने बचावले.

महामार्ग सुरक्षा पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर घटना घडताच पोलीस पथक घटनास्थळी येऊन जवळच असलेले नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला भ्रमणध्वनी करून नागेश जाधव, बाळू दालभगत यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकच्या कॅबिनला पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. वाहन चालक व सहकारी दोघांनी सतर्कता दाखवल्याने दोघांचे प्राण वाचले.

- Advertisement -

या घटने दरम्यान मुबंईहून नाशिककडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी काही वेळेतच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस कर्मचारी जगदीश जाधव, संजय नंदन, संतोष गांगुर्डे, दीपक दिंडे, विक्रम लगड, राम वारंघुसे, राहुल गांगुर्डे, नगरपालिका अग्निशमन दलाचे नागेश जाधव, बाळू दालभगत आदींनी घटनास्थळी परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -