घरक्रीडाIPL 2022: पंजाब किंग्जच्या 'या' खेळाडूनं मारला यंदाच्या पर्वातील सर्वात लांब षटकार

IPL 2022: पंजाब किंग्जच्या ‘या’ खेळाडूनं मारला यंदाच्या पर्वातील सर्वात लांब षटकार

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील ११ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. मुंबईच्या ब्रेब्रॉन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या पर्वातील चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) १५ व्या पर्वातील ११ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला. मुंबईच्या ब्रेब्रॉन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. या पर्वातील चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे. चेन्नई पंजाबमधील कालचा सामना रोमहर्षक ठरला. या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. विशेष म्हणजे पंजाबचा तुफानी फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन यानं या पर्वातील आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा षटकार मारला. त्यामुळं सध्या त्यानं मारलेल्या षटकाची क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

पंजाब किंग्जच्या लियाम लिव्हिंगस्टोन यानं कालच्या सामन्यात स्फोटक खेळी केली. लिव्हिंगस्टोननं एकूण ५ षटकार मारले पण त्याच्या एका षटकार या पर्वातील आतपर्यंतचा सर्वाधिक लांब षटकार ठरला आहे. लिव्हिंगस्टोनने सामन्याच्या पाचव्या षटकात मुकेश चौधरीच्या षटकात हा विक्रम केला. चौधरीच्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोननं तब्बल १०८ मीटरचा षटकार मारला. तसंच, याच षटकात त्यानं ३ चौकार आणि २ मोठे षटकार मारत एकुण २६ धावा केल्या.

- Advertisement -

फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार मारत ६० धावा केल्या. विशेष म्हणजे लिव्हिंगस्टोननं १८७.५० च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्या. या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करताना चेन्नईनं चांगली सुरुवात केली. पण फलंदाजी करत असलेल्या पंजाबच्या लियाम लिव्हिंगस्टननं चेन्नईच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबनं २० षटकांत १८० धावा केल्या. पंजाबच्या या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १८ व्या षटकापर्यंत सर्वबाद झाला. चेन्नईनं केवळ १२६ धावा केल्या. या पराभवासह चेन्नईनं या पर्वातील सलग तिसरा सामना गमावला.

- Advertisement -

अंबाती रायडून सोडला झेल

तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीसाठी आलेल्या लिव्हिंगस्टोनने धडाकेबाज फलंदाजी केली. मैदानात येताच लियामने मोठे फटके मारायला सुरुवात केली. मात्र ४५ धावांवर असताना रविंद्र जाडेजाने टाकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारताना तो चुकला. चेंडू थेट अंबाती रायडूच्या हातात गेला. मात्र अगदी सोपा असलेला हा झेल अंबाती रायडूने सोडला. झेल सुटल्यामुळे लिव्हिंगस्टोनला जीवदान मिळाले. त्यानंतर मात्र लियाम चांगलाच तळपला. त्याने चेन्नईच्या गोलंदांना चांगलेच झोडून काढले.

या पर्वात सर्वात लांब षटकार मारणारे खेळाडू

  • लियाम लिव्हिंगस्टोन १०८ मीटर
  • लियाम लिव्हिंगस्टोन १०५ मीटर
  • जॉस बटलर १०१ मीटर
  • इशान किशन ९८ मीटर

हेही वाचा – Petrol-Diesel Price: देशभरात १४ दिवसांत बाराव्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -