घरताज्या घडामोडीसमतानगर पोलिसांना आयुक्तांचा दणका, वरिष्ठांसह सात पोलिसांची बदली

समतानगर पोलिसांना आयुक्तांचा दणका, वरिष्ठांसह सात पोलिसांची बदली

Subscribe

कांदिवली येथील समतानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांची पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तडकाफडकी साईड ब्रँचला बदली केली आहे. त्यांच्यावर पासपोर्ट नूतनीकरण करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला वाईट वागणूक दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, या आरोपांचे पोलिसांनी खंडन करताना या व्यक्तीविरुद्ध कर्नाटकमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना त्याने मदत करण्याची विनंती केली होती, त्याला पोलिसांनी नकार दिला होता. त्यातून त्याने पोलिसांवर आरोप केला असून त्याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोहिते यांच्याकडून चौकशी सुरू असून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. बदली झालेल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके, पोलीस निरीक्षक रवींद्र पडवळ, पोलीस उपनिरीक्षक भागवत व्यवहारे, पोलीस शिपाई निलेश राजापुरे, अंजली गवळी, अशोक गाढवे आणि प्रशांत ठाकरे यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तपदाची सूत्र घेतल्यानंतर संजय पांडे यांनी पासपोर्टसाठी येणार्‍या नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही. त्यांना मदत करण्याचे आदेश सर्वच पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांकडे याबाबत काही तक्रारी केल्या होत्या. अशीच एक तक्रार एका तरुणीने पोलीस आयुक्तांकडे केली होती. त्यात तिच्या वडिलांना समतानगर पोलीस ठाण्यात काही पोलिसांकडून पासपोर्ट नूतनीकरण करण्यावरुन पोलिसांनी वाईट वागणूक दिली आहे.

- Advertisement -

या पोलिसांवर सक्त कारवाई करण्याची मागणीही या तरुणीने केली होती. या तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता पोलीस आयुक्तांनी या तरुणीसह तिच्या वडिलांची माफी मागून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांच्यासह सात पोलिसांची साईड ब्रॅचला बदली केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोहिते यांना देण्यात आले आहेत.


हेही वाचा : भाजप-मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव नाही, संदीप देशपांडेंची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -