घरमहाराष्ट्रनाशिकमनमाड मध्ये रेड्यांच्या झुंजीचा थरार

मनमाड मध्ये रेड्यांच्या झुंजीचा थरार

Subscribe

भाऊबीज नंतर चंपाषष्टीला रेड्यांची झुंज लावण्याची परंपरा

मनमाड:सण साजरे करताना आपल्या देशात आणि राज्यात अनेक वेगवेगळ्या परंपरा, प्रथा पाळल्या जातात मनमाड शहरात गवळी समाजात भाऊबीज नंतर चंपाषष्टीला रेड्यांची झुंज लावण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गुरुवार (दि. ९) शहरातील ऋषी वाल्मिकी स्टेडियमवर गवळी समाज आणि दुध संघातर्फे ही परंपरा पाळत रेड्यांची झुंज आयोजित करून चंपाषष्टी साजरी करण्यात आली.या या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील मोठ्या प्रमाणात गवळी बांधव त्यांचे रेडे घेऊन आले होते. झुंज जिंकणार्‍या रेड्याच्या मालकाला रोख बक्षीस आणि स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

शहर परिसरासह ग्रामीण भागात गवळी समाजाची मोठी संख्या आहे. त्यांच्यात भाऊबीज नंतर चंपाषष्टीला रेड्यांची झुंज लावण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे मात्र कोरोनामुळे दोन वर्षांपासून या झुंजी बंद होत्या परंतु आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे भाऊबीजनंतर आज गवळी समाज व शहर दूध संघा तर्फे शहरातील स्टेडियमवर रेड्यांची झुंज आयोजित आली होती.

- Advertisement -

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शहर परिसरातील गवळी बांधव त्यांचे रेडे घेवून आले होते टकरीत जिंकलेल्या रेड्याच्या मालकाला 1 हजार पासून 11 हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला शिवाय या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच रेड्यांच्या मालकांचाही दूध संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.रेड्यांच्या झुंजीचा थरार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. जोपर्यंत आम्ही रेड्यांची झुंज लावत नाही तोपर्यंत आमची भाऊबीज आणि चंपाषष्टी साजरी होत नाही, असे गवळी बांधवानी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -