घरमहाराष्ट्रनाशिकश्री कालभैरवनाथ जयंती व दीपोत्सवाचा लखलखाट

श्री कालभैरवनाथ जयंती व दीपोत्सवाचा लखलखाट

Subscribe

अकोले येथील सिद्धेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी, दीपोत्सवाने फेडले स्थानिकांच्या डोळ्यांचे पारणे

अकोलेः  सिद्धेश्वर मंदिर भक्त परिवाराच्या वतीने आयोजित येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ जयंती व दीपोत्सवाने स्थानिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या सोहळ्यासाठी हजारो दिव्यांची रोषणाई, फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. हजारो भाविकांनी व श्री स्वामी समर्थ सेवेकर्‍यांनी यावेळी देवाचे दर्शन घेतले.

२००० दिव्यांच्या लखलखाटाने संपूर्ण मंदिर परिसर उजळून गेला होता. तसेच, यावेळी दिव्यांच्या रचनेतून काढलेल्या ओम आकाराच्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होती. हे दृश्य पाहण्यासाठी अकोलेकरांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी वर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. येथे गणपती, मारुती, अंबिका देवी, शनी महाराज, श्री कालभैरव नाथांची मूर्ती आहे.

- Advertisement -

यावेळी भाविकांनी श्री कालभैरवनाथांना हार, खडीसाखर, उदबत्ती व बाजरीची भाकरी, लाल लसणाची चटणी, कांद्याची पात टाकलेले वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखवला. तसेच, सर्वांनी एका तालासुरात ११ वेळा श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण केले. कुटुंबाच्या संरक्षणाची कामना केली.

अकोले शहरातील अमृतवाहिनी प्रवरा नदीकाठी प्राचीन सिद्धेश्वर मंदिर असून या ठिकाणी श्री कालभैरवाचे स्वतंत्र मंदिर आहे. श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे. कालभैरवनाथ जयंती उत्सव व दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब पेटकर, संजय भुजबळ, प्रा. सुनील वलवे, पुजारी योगेश अगस्ते, सचिन भालेराव, प्रशांत कोळपकर, सौरभ भांगरे, अभिजित घुले, प्रा. गोपाल बूब, योगेश नाईकवाडी, अमित नाईकवाडी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व भाविकांना ५१ किलोचे लाडूचा प्रसाद समाजसेवक व भाविक संजय भुजबळांनी भाविकांना वाटला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -