घरमहाराष्ट्रनाशिकनिकृष्ट दर्जाचे मशीन देत १ कोटींची फसवणूक

निकृष्ट दर्जाचे मशीन देत १ कोटींची फसवणूक

Subscribe

९ जणांनी एकाला १ कोटी ३ लाख १ हजार ५६२ रूपयांना गंडा घातला. ही घटना एमआयडीसी अंबड येथे घडली.

निकृष्ट दर्जाचे मशीन देत ९ जणांनी एकाला १ कोटी ३ लाख १ हजार ५६२ रूपयांना गंडा घातला. ही घटना एमआयडीसी अंबड येथे घडली. याप्रकरणी विनीत प्रकाश पोळ (रा. अंबड) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नऊजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पॉवेल वेरेझेकोस्की, स्लावोमिर वॉझनियाक, कांची वरदैय्या, मिलिंद कुलकर्णी, हरीष खट्टर, रॉबर्ट सेनोस्की, प्रशांत रॉय, नितीनकुमार पांडे, हेमंत खाचणे (सर्वजण रा.एमआयडीसी इंड्स्ट्रियल एरिया महापे, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. एसक्युएफ मशीनचे उत्पादन करून देतो, असे आमिष ९ जणांनी विनीत प्रकाश पोळ यांना दाखविले. त्याबदल्यात ९ जणांनी पोळ यांच्याकडून १ कोटी ३ लाख १ हजार ५६२ रूपये घेतले. ९ जणांनी पोळ यांना कंपनीच्या डिझाईनप्रमाणे मशीन तयार न करता निकृष्ट दर्जाचे मशीन तयार करून देत विश्वासघात व फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. डी. म्हात्रे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -