घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील उद्याने नागरिकांसाठी खुली होणार, मनपा आयुक्तांचे निर्देश

शहरातील उद्याने नागरिकांसाठी खुली होणार, मनपा आयुक्तांचे निर्देश

Subscribe

कोरोना रुग्णसंख्या घातल्याने घेण्यात आला निर्णय, लहानग्यांच्या सुट्यांचा आनंद झाला द्विगुणित

नाशिक : शहरातील करोनाची तिसरी लाट निष्प्रभ ठरली असून, दैनंदिन रुग्णसंख्या शून्यावर आल्यामुळे शहरातील सर्व
उद्याने खुली करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. यानंतर पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी सर्व ५२४ उद्याने आज (दि.२७) पासून खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्यानांची साफसफाई करून नागरिकांसाठी ते खुले करण्याचे आदेश उद्यान विभागाने काढले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत बालगोपाळांसह नागरिकांना आता या उद्यानांमध्ये मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील करोना रुग्णसंख्या आता शून्यावर आली आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वीचजलतरण तलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि.२५) महापालिकेत बैठक घेऊन उद्यानेदेखील सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी मंगळवारी (दि.२६) उद्याने सुरू करण्यांसदर्भातील अधिकृत आदेश काढले आहेत. यानुसार आजपासून शहरातील सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली होणार आहेत. मार्च २०२० मध्ये करोनाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन घोषित केला होता.

- Advertisement -

देशभरातील सर्व दैनंदिन व्यवहारांवर निबंध आले. यामध्ये गर्दीच्याठिकाणांवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने नाट्यगृह, मैदाने, उद्याने, जॉगिंग ट्रॅकवरही निबंध आणले होते. त्यामुळे शहरातील ५२४ उद्यानेही बंद करण्यात आली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही ही उद्याने बंदच ठेवली होती. त्यानंतर तिसऱ्यालाटेत टाळे कायम होते. आता करोना प्रतिबंधक लसीकरणामुळे करोनाची तिसरी लाट सौम्य ठरली. अखेर ती लाट ओसरल्यानंतर राज्य सरकारने निबंध उठवल्यानंतर महापालिकेनेही टप्प्याटप्याने शहरातील निबंध उठवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -