घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात उभे राहणार संगीत महाविद्यालय; 'मविप्र' संस्थेची घोषणा

नाशकात उभे राहणार संगीत महाविद्यालय; ‘मविप्र’ संस्थेची घोषणा

Subscribe

नाशिक : शैक्षणिक क्षेत्रात १०८ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था आता लवकरच संगीत महाविद्यालय सुरु करणार असल्याची घोषणा संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड.नितीन ठाकरे यांनी केली.
संस्थेचे होरायझन अकॅडमीतर्फे ‘ग्रीन होरायझन क्लिन होरायझन’ संकल्पनेला अनुसरून शाळेच्या प्रांगणात आंबा, चिंच, वड, पिंपळ व सफरचंद इ.प्रकारच्या ६१ रोपांची लागवड केली. सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा उपक्रम राबवण्यात आला.

महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस उपायुक्त डॉ. किरण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. होरायझन अकॅडमीत रविवारी (दि.२७) वृक्षरोपन कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, मविप्र संस्था जिल्ह्यात ज्ञानदानाचे कार्य करीत असून सशक्त,सुद्रुढ समाज घडवण्यात मोलाची भूमिका निभावत आहेत. समाजाच्या जडणघडणीत महानगर पालिकेसोबत हातात हात घालून सहकार्य करावे असे आवाहन केले. डॉ.किरण चव्हाण म्हणाले, मविप्र संस्था जिल्ह्यात शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील शिक्षण दिले जाते. संस्थेच्या वतीने पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक शिक्षणावर देखील भर दिला जातो असे सांगितले.यावेळी सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक अ‍ॅड. लक्ष्मण लांडगे, संचालक रमेश पिंगळे, अ‍ॅड. संदीप गुळवे, डॉ. प्रसाद सोनवणे, शिवाजी गडाख, डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. प्रसाद सोनवणे, अमित बोरसे, प्रवीण जाधव, शालन सोनवणे, शोभा बोरस्ते, नंदकुमार बनकर, विजय पगार, शशिकांत जाधव, सेवक संचालक सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर, प्रा. नानासाहेब दाते, शिक्षणाधिकारी डॉ. अशोक पिंगळे, डॉ. नितीन जाधव, डॉ. डी. डी. लोखंडे, डॉ. अजित मोरे, डॉ. विलास देशमुख, प्रा. संजय पाटील, डॉ. आर. डी. दरेकर, प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण, डॉ. सतीश देवने, प्रा भोये, डॉ. सुरेखा कुलकर्णी, श्रुती देशमुख, रिचा पेखळे, अनिता नायडू, नेहा सोनवणे, निर्मला जाधव, प्रीत राय उपस्थित होते.

- Advertisement -
२१ हजार रुपयांचे बक्षीस

संस्थेच्या माध्यमातून सरचिटणीस निधी उभारून शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या प्रत्येक तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांना (एक मुलगा-एक मुलगी ) प्रत्येकी २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे अ‍ॅड.ठाकरे यांनी सांगितले. ग्रीन होरायझन, क्लिन होरायझन उपक्रम महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या नादब्रम्ह संगीत अकॅडमीतर्फे संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -