घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंधारे घेणार शिंदे गटाचा समाचार; महाप्रबोधन यात्रा १६ डिसेंबरला नाशिक जिल्ह्यात

अंधारे घेणार शिंदे गटाचा समाचार; महाप्रबोधन यात्रा १६ डिसेंबरला नाशिक जिल्ह्यात

Subscribe

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नाराजी वाढत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने महाप्रबोधन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेनिमित्त ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या 16 ते 18 डिसेंबर या तीन दिवसांत नाशिकसह मालेगाव व नांदगाव मतदारसंघात सभा घेणार आहेत. बर्‍याच दिवसांपासून दादा, आप्पा आणि सुहास भाऊंना भेटले नाही. महाप्रबोधन यात्रेनिमित्त त्यांचा विस्ताराने समाचार घेणार असल्याचा इशाराही त्यांनी रविवारी (दि.27) दिला.

शहरात आयोजित कृषीथॉन-२०२२ या कृषीप्रदर्शनाला अंधारे यांनी रविवारी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. केवळ शिंदे गटातीलच आमदार नाही तर भाजपचेही आमदार प्रचंड नाराज आहेत. माजी खासदार किरीट सोमय्या असतील किंवा माधव भंडारी, केशव उपाध्ये यांनी पक्षासाठी किती कष्ट उपसले. सोमय्या यांना तर गुंडांचा सामना करावा लागला. पुण्यातील नगरसेवकांकडून पायर्‍यांवर पाहुणचार मिळाला, तरीही त्यांना साधे मंत्रीपद मिळू शकले नाही, याची खंत भाजपमध्ये आहे. तर, शिंदे गटात एकमेकांचे मतदारसंघ ओढण्यावरुन प्रताप सरनाईक, अढळराव पाटील, अर्जून खोतकर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. पक्षातील अंतर्गत लाथाळ्या लवकरच बाहेर येतील आणि हे सरकार कोसळेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.

- Advertisement -

शिंदे गटातील नाशिकचे आमदार, खासदारांविषयी आत्ताच न बोलता महाप्रबोधन यात्रेत त्यांच्याविषयी सविस्तरपणे बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमधील काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याचे त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी बोलणे झाले. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी गटनेते विलास शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सुषमा अंधारेंचे वार-पलटवार
  • शिंदे गटातील नेत्यांची भाषाच आता बदलली
  • कणकवलीत राणेंचा होमवर्क घेतल्याने नीलेश व नीतेश राणे आगावूपणा करत आहेत
  • नारायण राणेंनी मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत
  • राज्यपाल कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते असावेत
  • पूजा चव्हाण-संजय राठोडप्रकरणी चित्रा वाघ यांनी भाजपचा राजीनामा द्यावा
  • मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयात का जात नाहीत
  • मुख्यमंत्र्यांनी हात दाखवून अवलक्षण का केले
  • अब्दुल सत्तार हे सर्वोत्तम अभिनेते; पण धादांत खोटे बोलतात
  • राज्यपाल जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या अस्मितेला हानी पोहोचवण्याचे काम करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -