घरमहाराष्ट्रनाशिकमलेशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘इस्पॅलियर’ शाळेच्या 'त्या' प्रकल्पाचा सन्मान

मलेशियातील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘इस्पॅलियर’ शाळेच्या ‘त्या’ प्रकल्पाचा सन्मान

Subscribe

नाशिक : डिझाईन फॉर चेंज या संस्थेमार्फत मलेशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘बी द चेंज’ या परिषदेमध्ये सहभागी होत इस्पॅलिअर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात दिल्या गेलेल्या रेडिओ शिक्षण या प्रकल्पाचे सादरीकरण केले. 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या या उपक्रमामध्ये 35 देशांमधून आलेल्या विविध बदलाच्या कथांमध्ये इस्पॅलिअरची कथा पहिल्या पाच क्रमांकांमध्ये निवडली गेली. विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाचा सन्मानही करण्यात आला.

आपल्या देशातील बदलाची कथा सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी देणारा हा उपक्रम अहमदाबाद येथील डिझाइन फॉर चेंज या संस्थेमार्फत ‘बी द चेंज’ या परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. मलेशियामध्ये झालेल्या या परिषदेत देशातील 3 हजार विद्यार्थ्यांमधून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान इस्पॅलिअर स्कूलच्या 15 विद्यार्थ्यांनी मिळविला. इस्पॅलिअर स्कूलमार्फत कोरोना काळामध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इस्पॅरेडिओ’मुळे हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण तर मिळालेच, परंतु विद्यार्थ्यांचा स्क्रिन टाइमही कमी झाला. देशाच्या शिक्षण क्षेत्रातील या बदलाची कथा या 15 विद्यार्थ्यांनी मलेशियामध्ये झालेल्या परिषदेत सादर केली. 15 देशांमधील सादर केलेल्या विविध कथांपैकी पहिल्या पाच कथांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या या विद्यार्थ्यांच्या कथेला मान मिळाला. मलेशियाच्या शिक्षणमंत्री इन अब अजीज बीन मामत यांच्या हस्ते डिझाईन फॉर चेंजचे मलेशियातील समन्वयक राल्फी यांच्या उपस्थितीत या परिषदेचा शुभारंभ झाला. इस्पॅलिअर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इप्सॅरेडिओच्या माध्यमातून या संवादाचे लाईव्ह प्रक्षेपण केले. इस्पॅलिअरच्या विद्यार्थ्यांनी कथक आणि शास्त्रीय संगीताचे सादरीकरण केले. शाळेच्या चेअरमन डॉ. प्राजक्ता जोशी, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदविला.

- Advertisement -
पुढच्या वर्षीचे यजमानपद भारताला

गेल्या 10 वर्षांपासून डिझाइन फॉर चेंज या संस्थेमार्फत हा उपक्रम राबविला जात असून, विविध देशांमध्ये त्याचे आयोजन केले जाते. पुढील वर्षी भारतातील अहमदाबाद शहरामध्ये हा उपक्रम होणार आहे. 65 देशांचे विद्यार्थी प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार असून, त्यांचे यजमानपद भारताला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -