घरमहाराष्ट्रनाशिकरेल्वे बुकिंग अधिकार्‍याविरोधात तक्रारी

रेल्वे बुकिंग अधिकार्‍याविरोधात तक्रारी

Subscribe

ऑनलाईन पैसे घेण्यास नकार; प्रवाशी संतप्त

लासलगाव : केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन दिले जात असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास लासलगाव रेल्वे बुकिंग ऑफिसकडून नकार मिळत असल्याने ग्राहक मात्र चक्रावले आहेत. येथील रेल्वे स्थानकातील बुकिंग अधिकारी प्रवाशांशी नीट बोलत नाही, सुट्या पैशांवरून गोंधळ, रिझर्व्हशनवरून नेहमी प्रवाशांना त्रास देणे अशा एक ना अनेक तक्रारी येत आहेत. मात्र तक्रार करूनही त्यांना काही फरक पडलेला नाही.

येथील लोकप्रतिनिधी प्रवाशांना आव्हान करतात की, त्यांनी तिकिटे, रिझर्व्हशन हे लासलगाव रेल्वे स्थानकावर करा जेणेकरून लासलगाव रेल्वे स्थानकाचा व्यवसाय दिसेल. याला प्रवाशीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. मात्र या सरकारी बाबू नागरिकांना समाधानकारक उत्तर देत नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

रिझर्व्हशन तिकीटसाठी कार्ड पेमेंट चालणार नाही तर थेट रोख पैशांची मागणी केली जात आहे. तिकीट खिडकीवर मोठ्या अक्षरात सर्व प्रकारचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील असे नोटिफिकेशन लावलेले असताना अधिकारी मात्र रेल्वेच्या नियमाची पायमल्ली करत आहेत. जर कार्ड पेमेंट बंद झाले आहे तर नोटिफिकेशन काढण्याची तसदी सुद्धा या महाशयांनी केली नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदी सरकारने ऑनलाइन व्यवहाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करत कॅशलेस व्यवहार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रेल्वे बोर्डानेसुद्धा रिझर्व्हशन तिकीटसाठी कार्डाच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा दिली होती. नागरिकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंगसारख्या अनेक यंत्रणांचा वापर करत आपल्या गरजा भागविण्यास सुरुवात केली आहे. मात्र रेल्वे तिकीट बुकिंगसाठी रोख रकमेची मागणी केली जात असल्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -