घरमहाराष्ट्रनाशिकदिलासादायक ; कोरोना रूग्णसंख्या हजारांखाली

दिलासादायक ; कोरोना रूग्णसंख्या हजारांखाली

Subscribe

, कोरोना आढावा बैठकीतून आकडेवारी आली समोर

अनेक दिवसांपासून स्थिर असलेली कोरोना रूग्णसंख्या हजारांखाली आल्यानं नाशिककरांना दिलासा मिळालाय. ही संख्या आणखी कमी होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, नागरिकांनीही गांभीर्य लक्षात घेऊन नियमांचं पालन करावं, असं आवाहन पालकमंत्री छगन भुजबळांनी केलं.

ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांचं काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नियोजन भवनात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात चार ऑक्सिजननिर्मीती प्रकल्प सुरू झाले असून, आठ प्रकल्पांच्या टेस्टिंगचं काम सुरू आहे. या कामात दिरंगाई झाल्यास संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही भुजबळांनी दिला.

- Advertisement -

 म्युकरमायकोसिस एकूण 758 रुग्णांमध्ये घट होवून सध्या 46 रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी 632 रुग्ण बरे झाले असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लसीकरणात आतापर्यंत 22 लाख 11 हजार 718 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले असून याचेप्रमाण 30.14 टक्के आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याने याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आदि उपस्थित होते.

ऑक्सिजन प्रकल्पासाठी ५६ कोटींना मान्यता

कोरोना काळात कोरोना विषयक उपाययोजनांसाठी आतापर्यंत 56 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात तिसर्‍या लाटेच्या पुर्व तयारी साठी साधारण एक हजार नवीन बेड्स वाढविण्यात आले असून आजच्या स्थितीला 97 टक्के बेडस शिल्लक आहेत. महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 100 किलोलिटरचे ऑक्सिजन टँक बसविण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच अजून तीन महिने पुरेल इतका औषधसाठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -