घरमहाराष्ट्रनाशिकडीजीवर बंदी घातलेली असतानाही नाशिकमध्ये धुलीवंदनाला डीजेच्या दणका

डीजीवर बंदी घातलेली असतानाही नाशिकमध्ये धुलीवंदनाला डीजेच्या दणका

Subscribe

गंगापूर, सातपूरमध्ये पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजेचा दणका

नाशिक : उच्च न्यायालयाने प्रदूषण वाढवणार्‍या डीजीवर बंदी घातलेली असतानाही धुलीवंदनाच्या दिवशी नाशिकमध्ये अनेक ठिकाणी डीजेच्या दणका ऐकायला मिळाला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा दणका सुरू असतानाही पोलीस मात्र गाफील होते. डीजे सिस्टीममुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होते. यामुळे रुग्णांसह नागरिकांना त्रास होतो. परिणामी, सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तरीही, नाशिक शहरात शुक्रवारी काही नागरिकांनी डीजेच्या तालावर रंगपंचमी साजरी केली. आयोजकांनी या रंगपंचमीसाठी पाण्याचे खासगी टँकर्सदेखील मागवले होते. शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून दुपारपर्यंत डीजेने संपूर्ण परिसर दणाणून गेला. गंगापूर रोडवर सिरिन मीडोज्, तर सातपूर पोलिसांच्या हद्दीत सदगुरूनगरमध्ये डीजे सुरू होता. विशेष म्हणजे, या ठिकाणी महापालिकेच्या जागेत हनुमान मंदिरासमोर डीजे
लावला होता. त्यामुळे परिसर दणाणला होता.

सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सदगुरु नगरमध्ये डीजे लावण्यात आल्याबाबत माहिती नाही. अद्यापपावेतो कोणीही तक्रार केलेली नाही. व्हिडीओ समोर आला तर कारवाई केली जाईल

– महेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर 

डीजे वाजवण्यास मनाई आहे तरी नागरिकांनी गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत डीजेच्या तालावर होळी, धुलीवंदन साजरी केल्याबाबत माहिती नाही. याबाबत माहिती घेतली जाईल

. – रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गंगापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -