घरमहाराष्ट्रनाशिकखासदार आमदारांच्या वादात नागरिकांची कोंडी

खासदार आमदारांच्या वादात नागरिकांची कोंडी

Subscribe

नाशिक : शासकीय योजना समाजातील प्रत्येक नागरीकापर्यंत पोहचविण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. याव्दारे नागरिकांना या योजनेत सहभागी करून घेण्याची संधी निर्माण करून दिली जाते. याकरीता खासदार हेमंत गोडसे यांनी देवळालीत शिबिराच्य आयोजनाची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली असताना केवळ आपल्या वैद्यकीय कारणास्तव हे शिबिर रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यामुळे नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या मानापमान नाट्यात नागरिक मात्र शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

खा. गोडसे यांनी गिरणारे गटातील नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हा महसूल प्रशासनाच्या माध्यमातुन या गटात शासन आपल्या दारी हा उप्रक्रम राबवत विविध प्रकारचे दाखले वितरणाचे शिबिर आयोजित केले आहे. गिरणारे येथेही शनिवारी (दि.१५) शिबिर प्रस्तावित आहे. परंतु, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या वैद्यकीय कारणास्तव हे शिबिरच रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. २ ऑक्टोबरला आमदारांनी हे पत्र पाठवत कार्यक्रम तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

खासदार गोडसे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाने शिवसेनेतून बाहेर पडतांना राष्ट्रवादीवर आरोप केले. त्यामुळे राज्यस्तरीय राजकारणाचे पडसाद आता स्थानिक स्तरावरही उमटू लागले असून याचा प्रत्यय देवळाली मतदारसंघात दिसून येत आहे. मात्र यामुळे नागरीक मात्र शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -