घरमहाराष्ट्रनाशिकड्रेनेजचे पाणी थेट गोदावरीत सोडू नका ; पालकमंत्री छगन भुजबळ

ड्रेनेजचे पाणी थेट गोदावरीत सोडू नका ; पालकमंत्री छगन भुजबळ

Subscribe

पालकमंत्री छगन भुजबळ : शहरातील स्मार्ट सिटी कामांची केली पाहणी

नाशिक : पौराणिक महत्व असलेल्या रामकुंडात स्वच्छ पाणी आल्याशिवाय नाशिक शहर स्मार्ट सिटी होणार नाही. त्यामुळे शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासोबतच ड्रेनेजचे पाणी प्रक्रिया केल्याशिवाय गोदावरी नदीपात्रात जाताच कामा नये, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. पालकमंत्री भुजबळांनी रविवारी  शहरातील विविध ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या कामांची पाहणी करत आढावा घेतला.

यावेळी महापालिका आयुक्त रमेश पवार, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, पालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील, देविदास भालेराव, स्मार्ट सिटीचे प्रकल्प संचालक दिग्विजय पाटील, किसन कानडे, निलेश परडे, निखिल भोईर, महेश जगताप, आशिष सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, गिरीजा शारंगधर, संजय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी नगरसेवक गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, कल्पना पांडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, महात्मा फुले कलादालन येथील प्रदर्शन हॉलसह ऑडिटोरियम येथे कॅन्टिनसह अद्ययावत व आकर्षक सेवा सुविधा आवश्यक आहेत.

- Advertisement -

रामकुंडसारखा परिसर गर्दीत हरवला आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेता येथील परिसर मोकळा करून चांगली प्रकाशव्यवस्था करुन ते ठिकाण सुशोभित कसे करता येईल, याकडे लक्ष द्यावे. दहिपूल परिसरात पावसाळ्यात पाणी साचते. हे टाळण्यासाठी हा परिसर समतल करून पाण्याचा योग्य निचरा होण्यादृष्टीने अद्ययावत व कायमस्वरूपी उपाययोजना करावी. गोदापात्रात सिमेंट काँक्रीटचे कामे होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

‘रामसेतू’वर सेल्फी पॉईंट

- Advertisement -

रामसेतू हा पुर्व व पश्चिम भागाला जोडणारा दुवा आहे, परंतु या पुलाची मजबुती कमी झाल्याने सध्या यावर वाहनांना प्रवेश बंद केला आहे. या पुलाचे मजबुतीकरण करणे आवश्यक असून हा पुल केवळ पादचार्‍यांसाठी खुला करून त्याचे सौंदर्यीकरण करून सुशोभित केल्यास यावर सेल्फी पॉईंट करता येणे शक्य आहे.

या ठिकाणी दिली भेट

  • महात्मा फुले कलादालनातील प्रदर्शन
    व ऑडिटोरियम हॉल
  • नेहरू गार्डन येथील स्मार्ट
    सिटी अंतर्गत झालेली कामे
  • रामवाडी व रामकुंड येथील
    गोदा प्रोजेक्ट
  • पंचवटीतील मोटार
    डेपोतील कामे
  • पं. पलुस्कर सभागृह
    ऑडिटोरियम कामे
  • दहीपूल येथील रस्त्यांच्या
    कामांची पाहणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -