घरदेश-विदेशHyderabad Rave Party : हैदराबादमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश; 142 जणांना अटक; अभिनेते,...

Hyderabad Rave Party : हैदराबादमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश; 142 जणांना अटक; अभिनेते, राजकीय नेत्यांच्या मुलांचा समावेश

Subscribe

हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्स टीमने एका रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी जवळपास 142 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात अनेक व्हीआयपी, राजकीय नेते, अभिनेत्यांच्या मुलांचा समावेश आहे. हैदराबाद पोलिसांच्या टास्क फोर्स टीमने बंजारा हिल्स भागातील एका पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये ही कारवाई केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या रेव्ह पार्टीमधून कोकेन, चरससह आदी मादत पदार्थ जप्त केले आहेत. या पार्टीमधून सुपरस्टार चिरंजीवीची पुतणी आणि अभिनेता नागा बाबूची मुलगी, निहारिका कोनिडला हिला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर नागा बाबून याने एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्या मुलीचा ड्रग्सशी कसलाही संबंध नाही असे म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच बिग बॉस तेलुगू रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता आणि गायक राहुल सिप्लीगंज यालाही या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे हैदराबाद पोलिसांनी लाँच केलेले नशामुर्ती संदर्भातील गाणे राहुल सिप्लीगंज याने गायले होते.

- Advertisement -

या पार्टीमधून ताब्यात घेतल्या अन्य लोकांमध्ये आंध्र प्रदेशच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगीचाही समावेश होता. याशिवाय तेलुगु देसम पक्षाच्या खासदाराचा मुलगाही या पार्टीत सहभागी होता. यावर तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव म्हणाले की, माझा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीसाठी पबमध्ये गेला होता. मात्र आपल्या मुलाबाबत चुकीची माहिती पसरवली जातेय. त्यामुळे शहरातील सर्वच पब बंद करायला हवेत असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणावरून निष्काळजीपणाचा ठपका ठेवत बंजारा हिल्सचे एसएचओ शिव चंद्रा यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या जागी टास्क फोर्समधील के नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपासून पोलिसांनी ड्रग्जविरोधातील मोहीम तीव्र केली आहे.

खम्मम जिल्हाचे माजी खासदाराची मुलगी या पबची कथित रुपाने मालकीन आहे. शहरात हा पब लोकप्रिय समजला जातो. पोलिसांनी ड्रग्सविरोधी मोहित अधिक तीव्र केली असतानाच Radisson Blu या हॉटेलवर छापेमारी करण्यात आली. यासाठी हैदराबादमध्ये आता Hyderabad-Narcotics Enforcement Wing समितीचे गठन करण्यात आले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -