घरमहाराष्ट्रनाशिकसमजूत काढूनही पेट्रोलपंप चालकांची मनमानी

समजूत काढूनही पेट्रोलपंप चालकांची मनमानी

Subscribe

पालकमंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी

नाशिक : पेट्रोलपंप चालकांच्या तक्रारीवरुन व्यक्तीश: पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हेल्मेट सक्तीच्या आदेशात त्यांनी पंपचालक व मालकांविरुध्द गुन्हे नोंदविण्याबाबत काहीही उल्लेख केलेला नाही. शहरातील पंपचालकांची समजूत काढली तरीही त्यांनी संप केला. पेट्रोलपंपचालक व मालकांनी असहकाराची भूमिका घेतली. असा अट्टहास योग्य नाही, अशा शब्दांत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.

विनाहेल्मेट वाहचालकास पेट्रोल दिल्यास आणि त्याचा मृत्यू झाल्यास पेट्रोलपंपचालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे पेट्रोलपंपचालक व मालक आक्रमक झाले आहेत. शहरात गुढी पाडव्यापासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी केली जात आहे.

- Advertisement -

पेट्रोलपंपचालकांनी थेट पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे पोलिसांच्या भूमिकेबाबत तक्रार केली. त्यानंतर पालकमंत्री भुजबळांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त सीताराम गायकवाड यांनी हेल्मेटसक्तीची अधिसूचना काढली. त्यात पेट्रोलपंपाबाबत कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुढी पाडव्यादिवशी संप न करण्याचे आवाहनही केले होते. तरीही गुढी पाडव्याच्या दिवशी पेट्रोलपंपचालकांनी संप केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -