घरताज्या घडामोडीडॉ.माधव गाडगीळ, सई परांजपेंसह सहाजणांना ‘गोदावरी गौरव’

डॉ.माधव गाडगीळ, सई परांजपेंसह सहाजणांना ‘गोदावरी गौरव’

Subscribe

जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक डॉ. माधव गाडगीळ, चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, नाटककार सई परांजपे, ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यासाठी लढणार्‍या श्रीगौरी सावंत यांच्यासह सहाजणांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणार्‍या राष्ट्रीय स्तरावरील गोदावरी गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कालिदास कलामंदिर येथे पुरस्कारांचे वितरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते केले जाणार आहे.

गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी पत्रकार परिषदेत केली. २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने १९९२ पासून गोदावरी गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. विविध सहा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींना सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने केला जातो. प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे १५ वे वर्षे असून लोकसेवा, संगीतनृत्य, चित्रपट, विज्ञान, क्रीडा, चित्रशिल्प या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येतेयावेळी उपाध्यक्ष संजय पाटील, चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद हिंगणे, अ‍ॅड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, गुरमीत बग्गा आदी उपस्थित होते.

पुरस्कारार्थी असे

नृत्यपद्मश्री दर्शना जव्हेरी (मणिपुरी नृत्य), शिल्पभगवान रामपुरे, सोलापूर, क्रीडाकाका पवार, (कुस्ती प्रशिक्षक), लोकसेवाश्रीगौरी सावंत (ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात योगदान), चित्रपटसई परांजपे, विज्ञानडॉ. माधव गाडगीळ (जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -