घरताज्या घडामोडीफडणवीस सरकार एका दिवसांत जाहीरातींवर खर्च करायचे ८५ हजार

फडणवीस सरकार एका दिवसांत जाहीरातींवर खर्च करायचे ८५ हजार

Subscribe

भाजप सरकार खोट्या जाहीराती दाखवून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यावेळी विरोधात असलेले आणि आता राज्यात सत्तेत असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वारंवार केले होते. मी लाभार्थीच्या जाहीरातीवरून तर तेव्हा राजकीय वातावरण तापले होते. मात्र आता भाजप सरकारने जाहीरातीवर केलेल्या खर्चाची आकडेवारी समोर आली असून, यावरून भविष्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार फडणवीस सरकार एका दिवसाला जाहीरातींवर ८५ हजार रुपये खर्च करायचे. पाच वर्षात सरकारने जनतेच्या पैशातून १५ कोटी ५१ लाख रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

राज्यात फडणवीस सरकार जाऊन आता महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. मात्र आता महाविकास आघाडी सरकारच्या काळात मागील सरकारचे एक ना अनेक कारनामे आता हळूहळू समोर येऊ लागले असून, आता फडणवीस सरकारच्या काळात टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून केलेल्या जाहीरातींवरील खर्चाचा आकाडा समोर आला आहे. या आकडेवारीवर नजर टाकली असती फडणवीस सरकारने पाच वर्षांमध्ये जाहीरातीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत महाराष्ट्र शासनाच्या टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवरुन जाहिरात प्रसिद्धीकरीता करण्यात आलेल्या खर्चाची माहिती मागवली होती. त्यावरून त्यांना मिळालेल्या पत्रातील आकडेवारी थक्क करणारी आहे. विशेष बाब म्हणजे जाहीरातीचा हा आकाडा प्रत्येक वर्षी वाढत गेल्याचे माहिती अधिकारातून समोर आली आहे.

फडणवीस सरकारने असा केला जाहिरातीवर खर्च –

devendra fadnavis rti
फडणवीस यांनी जाहीरातींवर केलेला खर्च
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -